वाढत्या कोरोनामुळे यूपीएससी पूर्वपरीक्षाही अखेर पुढे ढकलली


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशभरात निर्माण झालेली गंभीर परिस्थिती पाहता केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) पूर्वपरिक्षा पुढे ढकलण्यात आली आली आहे. UPSC exam postponed due to corona

कोरोनाच्या थैमानाचा फटका इयत्ता दहावी आणि बारावीसह सर्वच परिक्षांना बसला असताना महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षांनाही ब्रेक लागला आहे.‘युपीएससी’ने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पूर्व परीक्षा २७ जूनला होणार होती मात्र आता ती १० ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल. आयोगाच्या संकेतस्थळावर याबाबतचे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. मागील वर्षी देखील कोरोनामुळे जूनमध्ये होणारी पूर्व परीक्षा ऑक्टोबरमध्ये घ्यावी लागली होती.

UPSC exam postponed due to corona

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण