वैकुंठ स्मशानभूमीत महिला करतात अंत्यसंस्कार ; कोरोनाच्या संकटात 15 जणींचा समाजाला मोठा हातभार


विशेष प्रतिनिधी

पुणे : अंत्यविधीच्या कार्यापासून आजपर्यंत महिलांना दूर ठेवले होते. परंतु, 15 महिला स्वयंसेवक, असे कार्य पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत पार पाडत आहेत. त्या दररोज किमान 25 अंत्यसंस्कार करत आहेत. कोरोनाच्या संकटात त्यांच्या कार्याचा समाजाला मोठा आधार लाभत आहे. In pune women group is doing cremation. In Corona Crises a Big Help to Society

पारंपरिक रूढीनुसार महिलांना शतकानुशतके अंत्यसंस्कारांच्या कार्यापासून दूर ठेवले. परंतु, सध्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अंत्यसंस्काराच्या संपूर्ण प्रक्रियेस मदत करण्यासाठी महिलांचा एक गट पुढे आला.

गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. दररोज शहरातून किमान 60-75 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. त्यामुळे विविध सामाजिक गट आणि स्वतंत्र स्वयंसेवक अधिकाऱ्यांना मदत करण्यास पुढे आले आहेत.‘स्वरूप वर्धीनी’ संस्थेच्या सदस्या पुरुषांबरोबर वैकुंठ स्मशानभूमीत कार्य करत आहेत. अंत्यसंस्कारासाठी आलेले मृतदेह रुग्णवाहिकेतून बाहेर काढण्यापासून ते अंत्यसंस्कार करण्यापर्यंत त्या मदत करत आहेत. रुग्णवाहिकांमधून मृतदेह बाहेर काढणे आणि त्यावर अंत्यसंस्कार करणे, अस्थी आणि राख गोळा करतात. त्या 24 तासांत हे काम शिफ्टमध्ये करतात.

हा गट पुणे महापालिकेच्या विनंतीनुसार विद्युत, गॅस आणि लाकडाच्या दाहिन्यावर होणाऱ्या अंत्यसंस्कारांना मदत करत आहे. शिफ्टमध्ये काम करत असल्याने कामाचा ताण पडत नाही. एकूण 15 महिला सदस्य असलेल्या या गटात दोन ज्येष्ठ महिला असून काही कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत.

आम्हाला अशा कामात सामील व्हायचे होते. कधीकधी, मदत करण्याची गरज ही कम्फर्ट झोनमधून बाहेर काढते. निराशेच्या या कालखंडात परंपरांच्या सीमा मोडल्या पाहिजेत.
– मनीषा पाठक, ‘स्वरूप वर्धिनी’ च्या स्वयंसेवक

संधी मिळाल्यावर स्त्रिया कोणत्याही कामात मागे हटत नाहीत, हे या कामातून सिद्ध होते. लोकांनी असे काम करताना यापूर्वी महिलांना पाहिले नाही.
– किरण भट्टड , महिला स्वयंसेवक

आम्ही महिला सदस्यावर कामाची जबाबदारी देण्यास कचरत नाही. अलीकडेच एका अनोळखी मुलीवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी महिला सदस्यावर सोपविली होती.विशेष म्हणजे त्यांनी स्वतःच संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. ते खरोखर कौतुकास्पद होते.
-निलेश धायरकर, गटप्रमुख

In pune women group is doing cremation. In Corona Crises a Big Help to Society

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण