यमनोत्री, गंगोत्रीची दारे सहा महिन्यांनंतर उघडणार

कोरोनामुळे बंद असलेल्या जगप्रसिद्ध हिमालयी धाम यमुनोत्री व गंगोत्रीची दारे सहा महिन्यांनंतर शुक्रवारी व शनिवारी भाविकांच्या अनुपस्थितीत उघडण्यात येणार आहेत. कोरोना संक्रमणामुळे सलग दुसऱ्या वर्षी मंदिरात भाविकांना परवानगी देण्यात आलेली नाही. The doors of Yamanotri and Gangotri will open in six months


विशेष प्रतिनिधी

डेहराडून : कोरोनामुळे बंद असलेल्या जगप्रसिद्ध हिमालयी धाम यमुनोत्री व गंगोत्रीची दारे सहा महिन्यांनंतर शुक्रवारी व शनिवारी भाविकांच्या अनुपस्थितीत उघडण्यात येणार आहेत. कोरोना संक्रमणामुळे सलग दुसऱ्या  वर्षी मंदिरात भाविकांना परवानगी देण्यात आलेली नाही.

उत्तराखंड सरकारच्या सूचनेनुसार, उत्तर काशी जिल्हा प्रशासनाने दोन्ही धामांची दारे उघडण्याची तयारी पूर्ण केली आहे. यावेळी केवळ २५ जणच उपस्थित राहू शकणार आहेत. दारे उघडण्याच्या वेळी केवळ तीर्थ पुरोहित व प्रशासनिक अधिकारी उपस्थित राहणार आहेत.गंगोत्री मंदिर समितीचे सहसचिव राजेश सेमवाल यांनी सांगितले की, शुक्रवारी अक्षय्य तृतीयेच्या पावन पर्वावर यमुनोत्री धामची दारे व त्याच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी गंगोत्री धामची दारे उघडण्यात येतील. शुक्रवारी दुपारी अभिजित मुहूर्तावर यमुनोत्री धामची दारे सव्वाबारा उघडण्यात येतील तर गंगोत्री धामची दारे शनिवारी सकाळी ७.३१ वाजता उघडण्यात येणार आहेत.

सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसारच हा समारंभ होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी धामच्या परिसरातील कोणीही मंदिरात प्रवेश करू शकणार नाही.

राज्यातील कोरोना संक्रमणाची गंभीर स्थिती पाहून मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी चारधाम यात्रा स्थगित करण्याची घोषणा २९ एप्रिल रोजीच केली होती. या धामांची दारे ठरावीक वेळेस उघडतील; परंतु तेथे पूजापाठ केवळ तीर्थ पुरोहितच करू शकतील, असेही त्यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.

The doors of Yamanotri and Gangotri will open in six months

महत्त्वाच्या बातम्या