जपानमध्ये कोरोनाची चौथी लाट, आरोग्य यंत्रणा उध्वस्त नागरिकांचा घरातच होतोय मृत्यू


विशेष प्रतिनिधी

टोकियो : जपानमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने धडक मारली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे कोलमडून पडली आहे. चौथ्या लाटेत नागरिकांचा घरातच मृत्यू होत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहावयास मिळत आहे.Japan facing forth wave of corona

जपानचे सरकार हतबल झाले असून नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. बाधितांच्या संख्येच्या तुलनेत बेडची संख्या अपुरी पडू लागली आहे.ओसाका प्रांतात दोन महिन्यात १७ जणांचा घरातच मृत्यू झाला आहे.



त्यांच्यात कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. या रुग्णांना दवाखान्यात दाखल का केले नाही, याचे स्पष्टीकरण ओसाका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देता आले नाही. देशातील बहुतांश रुग्णालये भरलेली असून कोरोनाबाधित आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांना नाविलाजाने घरातच राहावे लागत आहे.

काल ओसाका येथे चोवीस तासात कोरोनाचे ९७४ रुग्ण आढळून आले तर टोकियोत हीच संख्या १०१० होती. गेल्या शुक्रवारी ओसाका नर्सिंग होममध्ये ६१ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यापैकी भरतीसाठी वाट पाहणाऱ्या चौदा जणांचा मृत्यू झाला.

जपानमध्ये केवळ एकच टक्के लसीकरण झाले आहे. तरीही ऑलिंपिक स्पर्धा सुरक्षितपणे पार पाडल्या जातील, असे पंतप्रधान सुगा सांगत आहेत. त्यामुळे खासदारांत नाराजी आणि संभ्रम निर्माण झाला आहे.

काल जपानमध्ये अनेक ठिकाणी आणीबाणी लागू करण्यात आली. देशातील कोरोनाची स्थिती गंभीर होत असल्याचे पाहून तीन लाखाहून अधिक नागरिकांनी एका याचिकेवर हस्ताक्षर करून टोकियो ऑलिंपिक रद्द करण्याची मागणी केली आहे.

Japan facing forth wave of corona

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात