लस, ऑक्सिजनप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही झाले गायब, राहुल गांधी यांची टीका


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील लस, ऑक्सिजन टंचाईवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील गायब झाल्याचा टोला लगावला आहे.Rahul Gandhi lashes on Narendra Modi

काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआयने काल गृहमंत्री अमित शाह हरविल्याची तक्रार दिल्ली पोलिसांकडे केली होती. त्यानंतर आज राहुल यांनी ट्विटद्वारे मोदींवर शरसंधान केले.आता फक्त सेंट्रल व्हिस्टा, औषधांवर, जीएसटी आणि इतरत्र पंतप्रधानांचे फोटो उरले आहेत, असे खोचक ट्विट राहुल यांनी केले.तर, अन्य एका ट्विटद्वारे त्यांनी लोकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

संपूर्ण देश संकटात असताना लोकांकडून घेतले जात आहे की दिले जात आहे हे सरकारने स्वतःला विचारायला हवे. सरकार मात्र स्वतःच्या जबाबदारी पासून पळ काढत आहे.

त्यामुळे गरजूंसाठी आता लोकांनीच एकत्र येऊन मदतीसाठी पुढाकार घ्यावा. भारताने एकजुटीने उभे राहावे, असे राहुल यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi lashes on Narendra Modi

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण