प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबा या आज 18 जून 2022 रोजी वयाच्या वर्ष शंभराव्या वर्षात पदार्पण करीत आहेत. 18 जून 1923 रोजी हिराबा यांचा जन्म झाला. हिराबा आज शतायु होणार असल्याने त्यांचे मूळगाव वडनगर येथे हटकेश्वर मंदिरात शतचंडी याग करण्यात येणार आहे. यानिमित्ताने सर्व मोदी बंधू वडनगर मध्ये जमणार आहेत. आपल्या आईचा शंभरावा वाढदिवस साजरा करणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.Unique centenary of Prime Minister Modi’s mother Shri Hiraba today
पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मातोश्रींचे बॉण्डिंग सगळ्या जगाला माहिती आहे. मोदी दरवर्षी आपल्या वाढदिवशी हिराबा यांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतात. त्याची छायाचित्रे जगभर प्रसिद्ध आहेत. मोदींनी परिव्राजक म्हणून घर सोडल्यानंतर दरवर्षी वाढदिवसाला आईची भेट घेणे हा त्यांच्या जीवनक्रमाचा अविभाज्य भाग झाला आहे. पण पंतप्रधान झाल्यानंतर विशेषत्वाने ही बाब जनतेसमोर आली आहे. त्याचीच ही छायाचित्रात्मक झलक :
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App