भारताच्या सैन्याचा संपूर्ण चेहरामोहरा बदलणाऱ्या सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या अग्निपथ योजनेचा विरोध करताना विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली जो प्रचंड हैदोस घातला जात आहे, जे अग्निकांड पेटवून देश जाळायची भाषा आणि कृती केली जात आहे त्याचे रहस्य “बॉयकॉट टूर ऑफ ड्युटी” या व्हाट्सअप ग्रुप मधून उघड झाले आहे. अर्थातच हे नव्या टूलकिटचे उघडे नागडे सत्य बाहेर आले आहे!!Fire against agnipath : toolkit of boycott tour of duty exposed
सुरुवात शाहीनबागी आंदोलनातून
सीएए, एनआरसी विरोधातील शाहीनबागी आंदोलन, मग कृषी कायद्याविरोधात पंजाब हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश पेटवायचे शेतकरी आंदोलन, त्यापाठोपाठ नुपूर शर्माच्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून जुम्मा नमाजानंतर प्रचंड झालेल्या दगडफेकी आणि आता केंद्र सरकारच्या पूर्णपणे लष्कराचा चेहरामोहरा बदलणाऱ्या महत्त्वाकांक्षी अग्निपथ योजनेला विरोध करताना संपूर्ण देशात घडविण्यात येणारे अग्निकांड या सगळ्यांचे टूलकिट आता फार पुढे गेले आहे!!
थेट मोदींवर हल्ला करण्याची योजना
अग्निपथ योजनेला विरोध करण्याच्या आधीची टूलकिट हे केंद्र सरकारला विशेषतः मोदी सरकारला पूर्णपणे खाली खेचण्यासाठी वापरले गेली होती. किंबहुना तो मनसुबा होता. पण आता अग्निपथ योजनेला विरोध करताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक हल्ला करण्याची आणि त्याही पुढे जाऊन पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींनी वर हल्ला करण्याची भाषा उघडपणे व्हाट्सअप मेसेजेस मधून फिरवली गेली आहे “बॉयकॉट टूर ऑफ ड्युटी” नावाच्या व्हाट्सअप ग्रुप मधून हे देश पेटवण्याची किंबहुना पंतप्रधान मोदींवर हल्ला करण्याची धमकी भरली भाषा वापरली आहे.
वैयक्तिक हल्ल्याचे मनसूबे
या आधीची टूलकिट वापरून मोदी सरकार खाली खेचता येत नाही प्रत्यक्षात मोदी सरकार लागतच की मस्त देखील करता येत नाही म्हणून त्या पुढे जाऊन थेट मोदींवर वैयक्तिक हल्ला करण्याचे नवे टूलकिट पुढे आले आहेत सीएए आणि एनआरसी विरोधातल्या शाहीनबागी आंदोलनात जी एलिमेंट होती त्याच प्रमाणे शेतकरी आंदोलनात जी एलिमेंट नंतर घुसली होती, तीच एलिमेंट आता जास्त आक्रस्ताळेपणाने अग्निपथ योजनेच्या विरोधात अग्निकांड घडवताना दिसताहेत!!
50 लाख कोटींचे नुकसान
या अग्निकांडाने 11 राज्यांना आपल्या ज्वालांमध्ये घेरण्याचा प्रयत्न केला आहेच. त्याचे नुकसानही प्रचंड झाले आहे. एका आकडेवारीनुसार गेल्या 6 वर्षात झालेल्या आंदोलनांमध्ये भारतात सुमारे 50 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. हे सर्व नुकसान रेल्वे, अन्य वाहतूक व्यवस्था यांच्यासारख्या सार्वजनिक मालमत्तेचे झाले आहे. देशाच्या विकासाशी संबंधित असणारी ही अत्यंत गंभीर आणि महत्त्वाची बाब आहे. देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला सरळ मार्गाने अटकाव करता येत नाही म्हणून असल्या टूलकिटच्या माध्यमातून सुरुवातीला प्रशिक्षण लेव्हलवर आणि आता प्रत्यक्ष ग्राउंडवर, रेल्वेच्या रुळांवर रेल्वेच्या डब्यांवर थेट हल्ले करून अग्निकांड घडवले जात आहे.
ऑपरेशन टोपाझ, 1000 कट्स
या अग्निकांडाच्या पलिकडे जाऊन आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आणि त्यांच्या मातोश्रींवर हल्ला करण्याचे मनसुबे उघडपणे आखले जात आहेत. यामागे नेमके कोण आहे? वगैरे शोधण्यासाठी फार मोठ्या दुर्बिणी लावण्याची गरज नाही किंवा फार मोठ्या गुप्तहेरांना काम देण्याचीही गरज नाही भारताविरुद्ध “ऑपरेशन टोपाज”, “थाउजंड कट्स” अशी भाषा वापरणारा आयएसआय यामागे आहे हे स्पष्ट करायला फार मोठ्या अभ्यासाची देखील गरज नाही.
कृषी कायदे मागे घेतले मग…
केंद्र सरकारने पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही विशिष्ट हेतूंनी कृषी कायदे मागे जरूर घेतले आणि आता अग्निपथ योजनेच्या निमित्ताने मोठी अग्निकांड घडवून ही योजना पूर्णपणे थांबवण्याचे मनसुबे आखले जात आहेत. भारतीय लष्कराचा संपूर्ण चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असणाऱ्या या महत्त्वाकांक्षी योजनेस नेमका कोणाचा अटकाव होतो आहे कोण कोणती भाषा वापरून तो अटकाव करते आहे हे फक्त “बॉयकॉट टूर ऑफ ड्युटी” या व्हाट्सअप ग्रुप मधूनच नव्हे तर बाकी सर्व विरोधकांच्या विविध स्टेटमेंट मधून स्पष्ट होताना दिसत आहे टूलकिट मधली ही पुढची गंभीर बाब आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more