संभाजीनगरचा पाणीप्रश्न : भाजप ते राज्यपाल चौफेर कोंडीनंतर खुद्द मुख्यमंत्र्यांना घालावे लागले लक्ष!!


प्रतिनिधी

मुंबई : संभाजीनगरच्या पाणीप्रश्नावर गेल्या काही महिन्यांपासून मराठवाड्यात आणि विशेषतः संभाजीनगर मध्ये राजकीय घमासान पाहायला मिळाले असताना दस्तुरखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाणी प्रश्‍नात लक्ष घालावे लागले आहे. भाजप ते राज्यपाल अशी चौफेर कोंडी झाल्यानंतर संभाजीनगरचा पाणीप्रश्न तातडीने सोडवा. योजनेसाठी निधी मागा हवा तेवढा निधी देतो पण पाणीप्रश्न शिल्लक उरता कामा नये, अशी तंबी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिली आहे. Sambhajinagar water issue: After BJP to Governor Chauffeur controversy, CM himself had to pay attention

संभाजीनगर मध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब पाटील दानवे आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मोठा जलआक्रोश मोर्चा काढला होता. त्यापाठोपाठ जालन्यात देखील अशाच प्रकारचा मोर्चा अधिक ताकतीने काढला. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह होशियारी यांनी दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर संभाजीनगरचा पाणीप्रश्न आणि महाराष्ट्रातला अन्य प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उघडपणे मांडले.


संभाजीनगरचा पाणी प्रश्न सोडवणे दूरच; ठाकरे – पवार सरकारने जल आक्रोश मोर्चावर लादल्या 14 अटी शर्ती!!


याचा मुख्यमंत्र्यांवर एक मोठा राजकीय दबाव तयार झाल्याने 15 दिवसांत मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर दुसऱ्यांदा बैठक घेतली. 8 जून रोजी मुख्यमंत्र्यांची संभाजीनगर मध्ये सभा होती. त्यापूर्वी 2 दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी पाणी प्रश्नावर बैठक घेऊन पाणीप्रश्न तातडीने सोडविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्यपालांनी पंतप्रधानांसमोर प्रश्न उपस्थित केला आणि जालन्याचा आक्रोश मोर्चा देखील भाजपने काढला त्यामुळे आज मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी परत एकदा पाणी प्रश्नावर बैठक घेऊन योजनेचा आढावा घेतला आणि आपण स्वतः प्रत्यक्ष त्या योजनेची पाहणी करणार आहोत, असे स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात संभाजीनगरसाठी जायकवाडी प्रकल्पातून थेट पाणी योजना तयार करण्यात आली होती. तिची सुरूवातही झाली होती. पण गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारने त्यात आडकाठी आणली होती. संभाजीनगर मध्ये शिवसेनेची महापालिकेत सत्ता असतानाही त्यामुळे मोठा असंतोष शहर आणि मराठवाडा दिसून येत आहे. पाणी प्रश्नाचे सगळे खापर शिवसेनेवर फुटणार आहे हे पाहून मुख्यमंत्री स्वतः यात लक्ष घालत आहेत. किंबहुना त्यांना लक्ष घालावे लागत आहे. हेच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आजच्या बैठकीतून दिसून आले आहे.

Sambhajinagar water issue: After BJP to Governor Chauffeur controversy, CM himself had to pay attention

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात