प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणि भाजपाला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी छोट्या पक्षांच्या आमदारांसह अपक्ष आमदारांनाही गळाला लावावे लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी आणि भाजपासाठी अपक्ष हे प्राधान्य बनले आहे. Independents came first for Congress; Ajit Pawar was made the mediator
राज्यसभा निवडणुकीत अजित पवारांचे समर्थक असलेल्या अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडीला झटका दिला आहे. हे लक्षात घेऊन अपक्षांना राजी करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेऊन त्यांना मध्यस्थी करण्यासाठी विनंती केल्याची सूत्रांची माहिती आहे.
अपक्षांसोबत घेणार बैठक
राज्यसभा निवडणुकीत हीच स्थिती शिवसेनेची होती, त्यावेळी शिवसेनेला अतिरिक्त मतांची आवश्यकता होती. मात्र अपक्षांनी दगाफटका केला आणि शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला, त्यावेळी महाविकास आघाडीचा घटक पक्ष असूनही शिवसेनेला एकट्याला मतांची जमवाजमव करावी लागली, हे दुःख सहन न झाल्यामुळे अखेर शिवसेनेने राज्यसभेत तुमचे तुम्ही बघा असा पवित्रा घेतला आहे.
त्यामुळे आता काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आव्हान बनले आहे. त्याकरता काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली, त्यानंतर अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी अपक्ष आमदारांची बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अशा प्रकारे आता विधान परिषद निवडणुकीत गेम चेंजरची भूमिका बजावणाऱ्या अपक्षांचे राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीतही महत्व वाढले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App