मोदी द्वेषातून आंतरराष्ट्रीय संबंधांबाबतही अफवा, राहुल गांधींनी ट्विट केली रशियाबाबत खोटी बातमी


कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि तथाकथित लिबरल्स यांना मोदी द्वेषामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर परिणाम झाल्याची फिकिर वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे रशिया आणि भारत यांच्यातील संबंध बिघडले असल्याची धादांत खोटी बातमी पसरविण्यात येत आहे. मात्र, रशियाच्या भारतातील राजदूतांनीच याचा खुलासा केला असून ही बातमी पूर्णत: तथ्यहिन असून दोन्ही देशांचे संबंध उत्तम असल्याचे म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि तथाकथित लिबरल्स यांना मोदी द्वेषामुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांवर परिणाम झाल्याची फिकिर वाटेनाशी झाली आहे. त्यामुळे रशिया आणि भारत यांच्यातील संबंध बिघडले असल्याची धादांत खोटी बातमी पसरविण्यात येत आहे. Rahul Gandhi tweeted false news about Russia

मात्र, रशियाच्या भारतातील राजदूतांनीच याचा खुलासा केला असून ही बातमी पूर्णत: तथ्यहिन असून दोन्ही देशांचे संबंध उत्तम असल्याचे म्हटले आहे.

द प्रिंट या वेब पोर्टलने बुधवारी भारत-रशिया यांच्यातील संबंध बिघडले असल्याची खोटी बातमी दिली. भारताने इंडो-पॅसिफिक देशांची आघाडी करण्याचा केलेला प्रयत्न आणि क्वाडा या व्यासपीठामुळे रशिया नाराज झाला आहे. त्यामुळे गेल्या २० वर्षांत प्रथमच भारत-रशिया वार्षिक समीट पुढे ढकलण्यात आली असे या वृत्तात म्हटले होते. भारत अमेरिकेकडे जास्त झुकल्याने रशियाने हा निर्णय घेतल्याचे त्यामध्ये म्हटले आहे.

 

भारत आणि रशियामध्ये धोरणात्मक करार झाल्यानंतर दरवर्षी या समीटच्या माध्यमातून दोन्ही देश संवाद साधतात. परंतु, या वेळी ही समीटच रशियाने पुढे ढकलली. चीनबरोबर तणावाचे संबंध असताना असे घडणे योग्य नसल्याचे या बातमीमध्ये म्हटले आहे.

 

राहुल गांधी यांचे आरोप रशियन राजदूतावाने तातडीने फेटाळून लावले आणि भारत- रशिया संबंध कायमच उत्तम राहतील, असेही स्पष्टपणे सांगितले.

———————————-

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी ही बातमी ट्विट करत भारत-रशियातील पारंपरिक संबंधांना हानी पोहोचविणे भविष्यात धोकादायक ठरू शकेल, असे म्हटले होते. परंतु, राहुल गांधी यांचा हा आरोपच खोट्या वृत्तावर आधारित असल्याचे उघड झाले आहे.

Rahul Gandhi tweeted false news about Russia

रशियाचे भारतातील राजदूत निकोलाय कुदाशेव यांनी या वृत्तामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा केला आहे. भारत आणि रशियातील धोरणात्मक सहकार्यात दिवसोंदिवस वाढ होत आहे. कोविडच्या महामारीचाही त्यावर काहीही परिणाम झालेला नाही, असे कुदाशेव यांनी स्पष्ट केल्याने संबंधित वृत्त पोर्टल आणि राहुल गांधी तोंडावर आपटले आहेत.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात