पंतप्रधान मोदी साधणार शेतकऱ्यांशी संवाद, ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार १८ हजार कोटी


माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना खास भेट देणार आहेत. शेतकरी सन्मान योजनेचा तिसरा हप्ता ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. अठरा हजार कोटी रुपयांचा निधी यातून दिला जाणार आहे. पंतप्रधान शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत.  PM Modi to interact with farmers

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना खास भेट देणार आहेत. शेतकरी सन्मान योजनेचा तिसरा हप्ता ९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. अठरा हजार कोटी रुपयांचा निधी यातून दिला जाणार आहे. पंतप्रधान शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. PM Modi to interact with farmers

२५ डिसेंबरला म्हणजेच देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते अयोध्येतील शेतकऱ्यांना कृषी कायद्यांमधली वैशिष्ट्ये समजावून सांगणार आहेत.

त्यानंतर उत्तर प्रदेशातील भाजपा कार्यकर्ते हे कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचं पत्र घरोघरी पोहचवणार आहेत. अयोध्येत एकूण ३७७ ठिकाणी तर संपूर्ण उत्तर प्रदेशात सुमारे अडीच हजार ठिकाणी शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी चौपालचे आयोजन केले जात आहे.

२५ डिसेंबरला उत्तर प्रदेशातल्या अडीच हजार ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान कृषी कायद्याचे महत्त्व शेतकऱ्यांना सांगणार आहेत.

PM Modi to interact with farmers

केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना असलेल्या पीएम किसान योजनेचा या वर्षातील तिसरा हप्ता 25 डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना संबोधित करताना पंतप्रधानांनी ही माहिती दिली होती. या दिवशी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण