प्रताप सरनाईकांच्या नावावर ११२ सातबारे, थेट ईडीकडे पोहोचविली कागदपत्रे


शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावावर 12 सातबारे असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी थेट अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) दिली आहे. 112 Satbare in the name of Pratap Sarnaik documents delivere

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या नावावर 12 सातबारे असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी थेट अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) दिली आहे. 112 Satbare in the name of Pratap Sarnaik documents delivere

प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांची ईडीकडून चौकशी झाली. या पार्श्वभूमीवर सोमय्या अचानक ईडी कार्यालयात पोहोचले. सोमय्या यांनी ईडी कार्यालयात जाऊन विहंग हौसिंग सोसायटीच्या घोटाळ्याची ईडीला माहिती दिली. सरनाईक यांनी या सोसायटीतील काही संपत्ती हडप केल्याचा आरोप करतानाच सरनाईक यांच्याकडे 112 सातबारे असल्याची तक्रारही केली.

सरनाईक यांनी 250 कोटी रुपये ढापले आहेत. त्यांनी कंपनीचे नावही बदलले आहे. सरनाईक यांनी ज्यांच्या संपत्ती जप्त केल्या त्यांची नावे सातबाऱ्यावर नसल्याचा दावा करतानाच सरनाईक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.

सोमय्या यांनी 16 डिसेंबरला ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रताप सरनाईक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सरनाईक यांच्या विहंग गार्डन या इमारतीला पालिकेचा परवाना नाही. ही इमारत अनधिकृत आहे. त्यामुळे महापालिका आणि पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचे सोमय्या यांनी आधीच सांगितलं होतं. त्यानुसार दोन दिवसात त्यांनी तक्रार दाखलही केली.

112 Satbare in the name of Pratap Sarnaik documents delivere

सोमय्या यांनी कांजूरमार्ग कारशेडवरूनही सरकारवर टीका केली आहे. एमएमआरडीने काय कारनामे केले हे कांजूरमार्ग कारशेडमध्ये सर्वांनी पाहिले आहेच, असं सांगतानाच एमएमआरडीए ठाकरे सरकारच्या सचिवासारखे काम करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण