सरकारी खर्चाने ममतांची स्टंटबाजी, टॅबलेट न देण्याचे खापरही मोदी सरकारवर फोडले


केंद्र शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेला विरोध करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीवर डोळा ठेऊन सरकारी खर्चाने मदतीची स्टंटबाजी करण्याची तयारी केली आहे. पश्चिम बंगालमधील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये टाकले जाणार आहेत. हे करताना टॅबलेट देता येत नाहीत याचे खापर मोदी सरकारवर फोडले आहे.

वृत्तसंस्था

कोलकत्ता : केंद्र शासनाच्या शेतकरी सन्मान योजनेला विरोध करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीवर डोळा ठेऊन सरकारी खर्चाने मदतीची स्टंटबाजी करण्याची तयारी केली आहे.  Mamata’s stunt at government expense

पश्चिम बंगालमधील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये टाकले जाणार आहेत. हे करताना टॅबलेट देता येत नाहीत याचे खापर मोदी सरकारवर फोडले आहे.

ममता बॅनर्जी यांनी मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, बारावीमध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मोदी सरकारने चीनी वस्तूंवर बंदी घातली आहे. त्यामुळे या किंमतीत टॅबलेट येऊ शकणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात पैसे टाकले जाणार आहेत. त्यातून त्यांनी टॅबलेट खरेदी करावा.

ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेला राज्यात विरोध केला आहे. २० लाखांवर शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करूनही त्याला मान्यता दिलेली नाही. त्यामुळे पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत दरवर्षी मिळणारे सहा हजार रुपये मिळणार नाही.

Mamata’s stunt at government expense

दुसऱ्या बाजुला त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याची तयारी मात्र केली आहे. पश्चिम बंगालमध्ये साडेनऊ लाख बारावीचे विद्यार्थी आहे. या कुटुंबांपर्यंत पोहोचण्यासाठी ममतांनी हा स्टंट केला आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण