महबूबा मुफ्ती म्हणाल्या, ३७० लागू होईपर्यंत निवडणूक लढविणार नाही अन आंतरराष्ट्रीय न्यायालयातही जाईन!


विशेष प्रतिनिधी 

श्रीनगर : गुपकार गॅँगने एका बाजुला डीडीसीच्या निवडणुका लढविल्या असताना जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी आता लोकशाही प्रक्रियेलाच नाकारण्याचे ठरविले आहे. Mehbooba Mufti said that she will not contest the elections till 370 is implemented

जम्मू-काश्मीरमध्ये 370 कलम लागू होत नाही आणि जम्मू-काश्मीरला स्वायत्ता बहाल केली जात नाही, तोपर्यंत कोणतीही निवडणूक लढणार नाही, अशी प्रतिज्ञाच महबूबा मुफ्ती यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयातही जाण्याची धमकी त्यांनी दिली आहे.


एका वृत्तवाहिनीशी बोलताना महबूबा मुफ्ती म्हणाल्या, जोपर्यंत जम्मू-काश्मीरचं संविधान बहाल केलं जात नाही. जोपर्यंत राज्यात 370 कलम लागू होत नाही, तोपर्यंत मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. जम्मू-काश्मीरला स्वायत्ता मिळण्यासाठीचा लढा अधिक तीव्र करणार आहे.

गुपकार आघाडीने विधानसभेची एकत्र निवडणूक लढवल्यास नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद निर्माण होणार नाही का? असा सवाल विचारल्यावर त्या म्हणाल्या, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी एकमेकांचे राजकीय स्पर्धक आहेत. पण जम्मू-काश्मीरसाठी आम्ही एकत्र आलो आहोत. शेवटी आम्ही काश्मीरी आहोत.

आम्ही केवळ निवडणुकीचा विचार करत नाही. तर आमच्याकडून जे हिसकावून घेतलं गेले आहे, त्यावर आम्ही बोलत आहोत. त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. विधानसभा निवडणुका होतील तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र बसू, चर्चा करू आणि निर्णय घेऊ. मी मात्र मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत नाहीये

Mehbooba Mufti said that she will not contest the elections till 370 is implemented

आपले वडील मुफ्ती मोहम्मद सईद यांनी काश्मीरच्या समस्या सोडवण्यासाठी माज्या वडिलांनी मोदींसोबत हात मिळवला नाही. तर भारताच्या पंतप्रधानांशी हात मिळविला होता. आघाडी करून भाजपला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. आमचा अजेंडा ठरलेला होता. तसेच आमच्या अटीवर आम्ही भाजपशी हातमिळवणी केली होती. त्यांनाही ते मान्य होते. पण सरकार पडल्यानंतर त्यांना जे हवं होतं तेच त्यांनी केलं. जोपर्यंत ३७० कलम पुन्हा आणलं जात नाही, जोपर्यंत जम्मू काश्मीरची राज्यघटना परत आणली जात नाही मी कोणतीही निवडणूक लढणार नाही,असे मेहबुबा मुफ्ती यांनी जाहीर केलं आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात