WATCH : लक्षात ठेऊ या फाळणीचा वेदनादायी स्मृतीदिन…


विशेष प्रतिनिधी

भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात प्रथमच भारताच्या पंतप्रधानांनी फाळणीच्या दिवसांमधल्या वेदनादायक आठवणीवर आपले दुःख व्यक्त केले आहे. For the first time in the history of India’s independence, the Prime Minister of India

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 14 ऑगस्ट या दिवशी, पाकिस्तान आपला निर्मिती दिन साजरा करत असताना भारतासाठी मात्र हा फाळणीचा दिवस असल्याचे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून फाळणीच्या मुक्या वेदनांना वाट करून दिली आहे.

14 ऑगस्ट 1947 हाच तो दिवस आहे, ज्या दिवशी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यामुळे आपल्या लाखो बांधवांना प्राणाला, मालमत्तेला आणि आपल्या सहोदरांना गमवावे लागले होते. ही कोट्यावधी भारतीयांसाठी अत्यंत वेदनादायी घटना आहे.

फाळणीच्या या दर्दनाक घटनेचे हे स्मरण आहे, अशा भावपूर्ण शब्दांत मोदींनी आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडत आहे. भारतीय पंतप्रधानांनी अधिकृतरित्या फाळणीच्या वेदना जाहीर स्वरूपात मांडणे याला भावनेपलीकडचे देखील महत्त्व आहे.

भारतीयांसाठी फाळणी ही कटू आठवण आहे. तो फक्त एका देशाच्या निर्मितीचा दिवस नाही, तर त्यामागची हिंसाचाराची पार्श्वभूमी फार भयानक आहे. हीच आठवण एक प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागविली आहे.

For the first time in the history of India’s independence, the Prime Minister of India

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात