एफडीएचा डोमिनोजला पिझ्झाला दणका; मुंबईतील तीन आउटलेटचे परवाने निलंबित

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर खाद्य आस्थापनांची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेदरम्यान मुंबईतील डोमिनोजला पिझ्झाच्या तीन आउटलेटचे खाद्य व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले आहेत. विलेपार्ले पश्चिम, बोरिवली पश्चिम आणि घाटकोपर पश्चिम येथील आर-सिटी मॉलमधील आउटलेटचा त्यात समावेश आहे. Domino’s Pizza

अन्न व औषधी प्रशासनानने ११ ऑगस्ट रोजी राज्यभरातील प्रमुख चेन रेस्टॉरंट्सविरोधात विशेष तपासणी मोहीम राबवली. डोमिनोज केएफसी पिझ्झा हट मॅकडोनाल्ड्स सबवे बर्गर किंग स्टारबक्स आणि मॉन्जिनीसयांसारख्या ब्रँडच्या एकूण १०४ आस्थापनांची तपासणी करण्यात आली.

तपासणीनंतर ९५ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या, तर काही आस्थापनांविरोधात तातडीची कारवाई करण्यात आली. ताज्या वृत्तांनुसार महाराष्ट्रात डोमिनोजच्या एकूण चार आउटलेटवर परवाना निलंबनाची कारवाई झाली असून त्यापैकी तीन मुंबईतील आहेत.



विलेपार्ले पश्चिम येथील डोमिनोज आउटलेटमध्ये FSSAI परवाना योग्य पद्धतीने प्रदर्शित करणे, पिण्याच्या पाण्याची तपासणी, खाद्यपदार्थांची साठवणूक, कीटक नियंत्रण आणि स्वच्छता सुविधांशी संबंधित त्रुटी आढळल्याचे एफडीएने नमूद केले. गोठवलेल्या खाद्यपदार्थांचे योग्य तापमान राखणे, स्वयंपाकघराची स्वच्छता सुधारणे, खाद्य आणि गैर-खाद्य वस्तू वेगळ्या ठेवणे तसेच कीटक आणि उंदीरांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.

बोरिवली पश्चिम येथील आउटलेटमध्ये ५४ टक्के नॉन-कम्प्लायन्स आढळल्याचे एफडीएच्या तपासणीत समोर आले. खाद्यपदार्थांची साठवणूक, तापमान नियंत्रण, अन्न तपासणी, स्वच्छता आणि कीटक नियंत्रणाशी संबंधित त्रुटी नोंदवण्यात आल्या. आर-सिटी मॉल, घाटकोपर पश्चिम येथील Domino’s आउटलेटमध्ये स्वच्छता आणि सॅनिटायझेशनचे वेळापत्रक, कीटक नियंत्रणाच्या नोंदी, FIFO/FEFO पद्धतीने खाद्यसाठ्याची हाताळणी, तापमान नियंत्रण तसेच खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या तपासणीशी संबंधित नोंदींमध्ये त्रुटी आढळल्याचे एफडीएने सांगितले.

एफडीएने भांडुप परिसरातील मुंबई मेट्रो ढाबा आणि गुलशन दा पंजाबी ढाबा यांच्याविरोधातही परवाना निलंबनाची प्रक्रिया सुरू केली आहे. या आस्थापनांमध्ये स्वच्छता, पाणी तपासणी, वायुवीजन, कीटक नियंत्रण आणि खाद्यपदार्थांच्या साठवणुकीसंदर्भात त्रुटी आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कच्चे आणि शिजवलेले अन्न तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ स्वतंत्रपणे ठेवणे, स्वच्छता, रेफ्रिजरेशन, तापमान नियंत्रण आणि हात धुण्याच्या सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

FDA crackdown on Domino’s Pizza; licences of three Mumbai outlets suspended

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात