विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हिंदू महिला आणि मुस्लिम पुरूष अशा सेक्स स्टोरीज चालविणाऱ्या अमेझॉन विरोधात नेटकरी बरेच संतापले आहेत. अमेझॉनविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असतानाच ट्विटरवर #अँटी हिंदू अमेझॉन – किंडल ट्विटरवर जोरात ट्रेंड झाला आहे. सुमारे तीन – चार तासांपूर्वी #हम सब हिंदूवादी हा ट्रेंड जोरात होता. AntiHindu_Amazon_Kindle Currently trending
हा ट्रेंड जोरात येण्याचे कारणही अमेझॉनचे हिंदू विरोधी कँम्पेनच होते. पण सध्या अँटी हिंदू अमेझॉन अँड किंडल हा ट्रेंड टॉपवर आहे. १२ हजार जणांनी हा ट्विट रिट्विट करून अमेझॉनच्या विरोधातील मोहिमेला पाठिंबा दिला आहे. हम सब हिंदूवादी ट्रेंडने तीन तासांपूर्वीच १९ हजारांचा टप्पा ओलांडला होता.
जगात कोणताही हिंदू विरोधी कारवायांना आता नेटकरी ताबडतोब आणि खणखणीत प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. या खेरीज टॉप टेन ट्विटर ट्रेंडमध्ये अन्नपूर्णा जयंती आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा आणि कृषी कायद्यांना पाठिंब्याचे ट्रेंडही चालू आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App