राष्ट्रवादीचा बलात्कारी प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेखला अद्याप अटक नाही; नागपूरात भाजपाचे गृहमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन


  • ठाकरे – पवार सरकारची दडपशाही,५० कार्यकर्त्यांना पोलीसांनी गाडीत कोंबले

विशेष प्रतिनिधी

नागपूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाअध्यक्ष मेहबुब शेख यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. आरोपीला तात्काळ अटक आणि शिक्षा करण्यात यावी या मागणीसाठी आज भाजपकडून तीव्र निदर्शने करण्यात आली आहेत. NCP’s rapist state president Mehboob Sheikh has not been arrested yet

गृहमंत्री अनील देशमुख यांच्या घराजवळ भाजपाने आंदोलन केले. हे आंदोलन सुरू असताना सरकारने दडपशाहीचा वापर केल्याचे दिसून आले आहे. ५० कार्यकर्त्यांना पोलीसांनी धक्काबुक्की करत गाडीत कोंबले व त्यांना अटक केली आहे. गृहमंत्र्यांच्या घरासमोर पोलीसांनी किल्ल्यासारखी सुरक्षा व्यवस्था केली आहे. अशीच सुरक्षा राज्यात महिलांना का देत नाहीत असा सवाल उपस्थित होत आहे.यासाठी भाजप आक्रमक झाली आहे.

NCP’s rapist state president Mehboob Sheikh has not been arrested yet

भारतीय जनता युवा मोर्चाने हिंगोलीतील गांधी चौकामध्य प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन केले. राष्ट्रवादी आणि यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक गणेश बांगर, युवा प्रदेश कार्यकारणी सदस्य शिवाजी मुटकुळे, शिवशंकर घुगे, शशिकांत वडकुते, सरचिटणीस अजयराव दत्तराव कदम, भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष विश्वजीत गहलोत, कैलास खर्जुले, भाजपा युवा चिटणीस अंकुश जैस्वाल आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवक प्रदेश अध्यक्षाला दोन दिवसांत अटक नाही झाली तर भारतीय जनता युवा मोर्चा यापेक्षा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण