UP voting : तिसऱ्या टप्प्यात 10 वाजेपर्यंत 8% मतदान; समाजवादी पक्ष 300 आकडा गाठेल; दोन यादवांचा दावा!!


वृत्तसंस्था

लखनऊ : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात 16 जिल्ह्यातील 59 मतदारसंघांमध्ये मतदान सुरू झाले असून सकाळी 10.00 वाजेपर्यंत वाजेपर्यंत सुमारे 8% टक्के मतदान झाले आहे. U P voting: 8% voting till 10 am in the third phase; The Socialist Party will reach 300 figures; Claim of two Yadavs !!

मतदानाचा हा तिसरा टप्पा सुरू असताना समाजवादी पक्षाच्या दोन यादव नेत्यांनी 300 चा आकडा पार करण्याचा दावा केला आहे. खासदार रामगोपाल यादव यांनी तर राज्यातील प्रत्येक टप्प्यातील मतदानात समाजवादी पक्ष किती जागा जिंकेल, याचा आकडाच सांगून टाकला आहे पहिल्या दोन टप्प्यात 100 तिसऱ्या टप्प्यात 150 आणि चौथ्या टप्प्यात निर्विवाद बहुमताचा आकडा समाजवादी पक्ष पार करेल, असा दावा यांनी केला आहे. तर करहाल मतदारसंघात अखिलेश यादव सुमारे 1.50 लाख मतांनी निवडून येतील आणि केंद्रीय मंत्री एस. पी. सिंह बघेल यांचे डिपॉझिट जप्त होईल, असाही त्यांचा दावा आहे.



तर दुसरीकडे पक्षाचे दुसरे नेते आणि अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांनी देखील समाजवादी पक्ष 300 चा आकडा पार करण्याचा दावा केला आहे. राज्यातली चर्चा मात्र अखिलेश यादव यांना कर हाल मधली निवडणूक अवघड जात असल्याची आहे.

U P voting : 8% voting till 10 am in the third phase; The Socialist Party will reach 300 figures; Claim of two Yadavs !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात