VIRAL VIDEO : काँग्रेसला स्वपक्षीय कानपिचक्या ! ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह म्हणाले २०२३ ची निवडणुक काँग्रेससाठी शेवटची ; कार्यकर्ता देखील मिळणार नाही … …


२०१४ साली केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर काँग्रेसची राष्ट्रीय पातळीवर झालेली अवस्था चर्चेचा विषय ठरली आहे.


भाजपने गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी काँग्रेसला धोबीपछाड दिला.


विशेष प्रतिनिधी

रतलाम : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह शनिवारी रतलाममध्ये पोहोचले होते .यावेळी त्यांनी काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांना चांगलेच सुनावले .त्यांना एकत्र येण्याचे आवाहन करत आपण २०२३ निवडणूक जिंकू शकणार नाही आपल्याला कार्यकर्ता देखील मिळणार नाही अशा शब्दांत कानउघाडणी देखील केली .दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका करत काँगेसला घरचा आहेर दिला .त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.Self-whispering Congress! Senior leader Digvijay Singh says 2023 elections are the last for Congress …

१५ वर्षांनी मिळवलेली मध्य प्रदेशातली सत्ता काँग्रेसला अंतर्गत बंड शमवता न आल्यामुळे सोडावी लागली होती. याबद्दल देखील दिग्विजय सिंह यांनी परत एकदा खंत व्यक्त केली .

काही महिन्यांच्या कालावधीपासून अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला रामराम केला. मध्य प्रदेशातली काँग्रेसची सत्ताही अशाच अंतर्गत बंडाळीमुळे भाजपच्या हातात गेली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सध्याच्या परिस्थितीवरुन मध्य प्रदेशातील स्वपक्षीय नेत्यांना कानपिचक्या देत, २०२३ ची निवडणुक जर आपण एकत्र येऊन लढलो नाही तर ती काँग्रेससाठी शेवटची निवडणुक असेल असं म्हटलं आहे.

मध्य प्रदेशातील रतलाम येथील सर्कीट हाऊसमध्ये दिग्विजय सिंह यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत पक्षातल्या अंतर्गत नाराजीवर चर्चा झाल्याचं कळतंय. या बैठकीत बोलत असतानाचा दिग्विजय सिंह यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

“तुमच्यापैकी कोणीही समोरासमोर बसून बोलायला तयार नाहीये. एक जण इकडे उभा आहे तर दुसरा तिकडे उभा आहे…तिसरा कुठेतरी भलतीकडेच आहे. २०२३ ची निवडणुक ही आपल्यासाठी शेवटची निवडणुक असणार आहे. अशाने गोष्टी साध्य होणार नाहीत. जर तुम्ही आगामी निवडणुक सच्चाईने लढवली नाहीत, तर मग घरी बसा. काँग्रेस सत्तेत येणार नाही. नंतर तुम्हाला कार्यकर्तेही मिळणार नाहीत”, अशा शब्दांत दिग्विजय सिंह यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं आहे.

मध्य प्रदेशात २०२३ च्या अखेरीस निवडणुका होणार आहेत.

भाजपचा पराभव करुन मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेत आलं. परंतू नाराज ज्योतिरादीत्य सिंधीया यांची समजूत काढण्यात काँग्रेस पक्ष अपयशी ठरल्यामुळे सिंधीया यांनी भाजपची साथ दिली. ज्यानंतर कमलनाथ सरकार पडून शिवराजसिंह चौहान पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले

 

Self-whispering Congress! Senior leader Digvijay Singh says 2023 elections are the last for Congress …

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात