टोकियो ऑलिम्पिक: मणिपूर सरकार मीराबाईंना एक कोटी रुपयांची देणार भेट, ऑलम्पिकच्या पहिल्याच दिवशी पदक जिंकण्याचा ही मिळवलाय मान


टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले पदक जिंकले आहे.  वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 kg किलो वजन गटात एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. Tokyo Olympics: Manipur govt to give Rs 1 crore gift to Mirabai


विशेष प्रतिनिधी

टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने पहिले पदक जिंकले आहे.  वेटलिफ्टर मीराबाई चानूने महिलांच्या 49 kg किलो वजन गटात एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले.  ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी पदक जिंकणारी मीरा ही पहिली भारतीय खेळाडू आहे.  चीनच्या हौ जिहुईने 210 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले.  इंडोनेशियाच्या कांटिका विंडीने कांस्यपदक जिंकले.



मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांनीही मीराबाईंशी थेट संवाद साधला.  मीरा यांना मणिपूर सरकारने एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा त्यांनी केली आहे.  बीरेन सिंग यांनी सोशल मीडियावर त्यांच संभाषण शेअर केले आहे.

बिरेनसिंग यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले की मीराबाईंनी पदक जिंकले त्या वेळी गृहमंत्री अमित शहा यांच्यासह ईशान्येकडील सर्व मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक चालू होती.  अशा स्थितीत बैठकी दरम्यान बिरेन सिंग यांनी पदक मिळवल्याची बातमी दिली आणि मग सर्वांनी उभे राहून मीराचे अभिनंदन केले.

Tokyo Olympics: Manipur govt to give Rs 1 crore gift to Mirabai

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात