टाटा स्टिल कंपनीचा निर्णय : कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वयाच्या साठ वर्षांपर्यंत कुटुंबाला पूर्ण वेतन, घर आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च


कोरोनामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वयाच्य साठ वर्षांपर्यंत कुटुंबाला पूर्ण वेतन देण्याचा निर्णय टाटा स्टिल कपंनीने घेतला आहे. कंपनीने म्हटले आहे की कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे सेवा पूर्ण होईपर्यंत कुटुंबास संपूर्ण वेतन दिले जाणार आहे. याबरोबरच निवास आणि वैद्यकीय सुविधादेखील देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही कंपनी उचलणार आहे.Tata Steel’s decision: In case of death of an employee, full salary, house and education expenses of the family up to 60 years of age


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: कोरोनामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वयाच्य साठ वर्षांपर्यंत कुटुंबाला पूर्ण वेतन देण्याचा निर्णय टाटा स्टिल कपंनीने घेतला आहे. कंपनीने म्हटले आहे की कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे सेवा पूर्ण होईपर्यंत कुटुंबास संपूर्ण वेतन दिले जाणार आहे.

याबरोबरच निवास आणि वैद्यकीय सुविधादेखील देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही कंपनी उचलणार आहे.
टाटा स्टील व्यवस्थापनाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की,



कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेच्या मदतीसाठी सर्वतोपरी पुढाकार घेत आहे. यामुळष कंपनीत कार्यरत प्रत्येक कर्मचाऱ्याचे भविष्य उत्तम होईल. कोरोनामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास टाटा स्टील 60 वर्षे त्यांच्या अवलंबितांना संपूर्ण वेतन देईल.

पगाराशिवाय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनाही क्वार्टर आणि वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील. जर कर्तव्य बजावताना कंपनीत कामगार मृत्युमुखी पडला तर त्यांच्या मुलांच्या पदवीचा संपूर्ण खर्च कंपनी व्यवस्थापन उचलेल.

यापूर्वी टाटा यांनी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेक पावले उचललीत आणि एक आदर्श घालूनदिला आहे. कोविडच्या काळातही टाटा स्टील आपल्या सर्व कर्मचाºयांच्या आणि समाजाच्या सामाजिक कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Tata Steel’s decision: In case of death of an employee, full salary, house and education expenses of the family up to 60 years of age

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात