अंदमानात वर्षातील पहिला पाऊस बरसला ; मॉन्सून वारे दाखल ; केरळकडे वाटचाल सुरु


वृत्तसंस्था

पुणे : अंदमानात वर्षातील पहिला पाऊस शुक्रवारी बरसला. मॉन्सून वारे दाखल झाल्याने प्रवासास सुरुवात झाली आहे. त्याची केरळकडे वाटचाल सुरु झाली आहे. माहिन्याअखेरीस तो केरळात पोचेल, असा अंदाज आहे. Seasonal Rains Enter The Andamans

नैर्ऋत्य मोसमी वारे (मान्सून) अंदमानच्या परिसरात शुक्रवारी दाखल झाले आहेत. मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. पुढील ४८ तासांमध्ये ते आणखी प्रगती करणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले.



संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना सुखावणारे आणि जलसाठ्यांना तृप्त करणारे मोसमी वारे २२ मे रोजी अंदमानात दाखल होण्याचा अंदाज होता. पण, यंदा ते एक दिवस आधीच दाखल झाले आहेत. अंदमानमध्ये मोसमी पावसाच्या ढगांची निर्मिती होऊन काही भागात पाऊस सुरू झाला आहे. यंदाच्या हंगामात देशात सरासरीप्रमाणेच ९८ टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच वर्तविला आहे.

महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात

केरळात मोसमी वारे १ जून रोजी पोचणार आहेत. यंदा ते ३१ मे रोजी पोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर ६ ते ८ दिवसांत ते तळकोकणमार्गे ते महाराष्ट्रात दाखल होऊ शकतात.

Seasonal Rains Enter The Andamans

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात