चंद्रावर बर्फ आहे? शोधासाठी नासा चंद्रावर उतरवणार साडेसोळाशे कोटी रुपयांचा रोबोट


कोरोना संकटाशी जग झुंजत असतानाच अमेरिकेच्या नासाने महत्त्वाकांक्षी चांद्र मोहिमेची तयारी केली आहे. चंद्रावर कायमस्वरुपी मानवी वस्ती करण्याचे स्वप्न माणसाने पाहिले आहे. त्यादृष्टीने चंद्रावरील विवरांमध्ये, जमिनीखाली गोठलेले पाणी आहे का याचा शोध घेण्यासाठी नासा चंद्रावर मध्यम आकाराचा रोव्हर (मोबाईल रोबोट) पाठवणार आहे. मध्यम आकाराच्या रोव्हर विकासासाठी सुमारे एकतीसशे कोटी रुपयांची गुंतवणूक नासाने केली आहे. तर चंद्रावर रोव्हर चंद्रावर उतरवण्याच्या मोहिमेचा अपेक्षित खर्च सुमारे साडेसोळाशे कोटी रुपये आहे. The United States National Aeronautics and Space Administration is planning to search for water and other resources on the moon in 2023. The US agency will send its first mobile robot to the Moon in search of ice and other resources on it.


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (नासा)ने सन 2023 मध्ये चंद्रावरील पाणी आणि इतर स्त्रोतांचा शोध घेण्याचा संकल्प सोडला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर आणि त्याखाली गोठलेल्या स्वरुपात पाणी (बर्फ) असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याशिवाय चंद्रावर अन्य उपयुक्त खनिज संपत्ती आहे का याचाही शोध घ्यायचा आहे.

त्यासाठी नासा पहिला मोबाईल रोबोट चंद्रावर पाठवण्याच्या विचारात आहे. नासाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. ‘व्होलाटाईल्स इन्व्हेस्टिगेटिंग पोलर एक्सप्लोरेशन रोव्हर’ अर्थात ‘वायपर’ हा रोबोट चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून डाटा गोळा करणार आहे. चंद्रावर मानवी वस्ती करण्याचे स्वप्न मानव दीर्घकाळापासून पाहात आहे. त्यासाठी आवश्यक माहिती यातून मिळण्याची नासाला अपेक्षा आहे.



वॉशिंग्टनस्थित नासाच्या ग्रह विज्ञान विभागाच्या मुख्यालयाच्या संचालक लोरी ग्लेझ यांनी सांगितले, “चंद्रावरील बर्फाचे स्वरुप आणि नेमके स्थान शोधण्यासाठी वायपरने गोळा केलेला डाटा कामी येणार आहे. चंद्रावरील वातावरणाचा अदमास घेण्यासाठी आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील संभाव्य स्त्रोतांची मिळवण्यासाठी वायपरचा उपयोग होईल. आर्टमीस अंतराळवीरांच्या तयारीसाठी ही माहिती कामी येणार आहे.”

रोबोटीक विज्ञानाच्या उद्दीष्टे आणि मानवी शोध मोहिमा हातात हात घालून कशा काम करतात याचे हे आणखी एक उदाहरण आहे. चंद्रावर शाश्वत मानवी अधिवास निर्माण करण्यासाठी या दोन्हीची आवश्यकता असल्याचे ग्लेझ पुढे म्हणाल्या. चंद्रावर पाऊल टाकणारा वायपर रोव्हर सौर उर्जेवर चालतो. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर प्रकाश आणि गडद छायेचा बदलणारा खेळ चालू असतो. त्यावेळी वेगाने बदल स्विकारून या रोबोटला काम करायचे आहे.

एजन्सीच्या कमर्शियल ल्युनर पेलोड सर्व्हिसेस (सीएलपीएस) उपक्रमाचा एक भाग म्हणून नासाने व्हीआयपीईआरच्या प्रक्षेपण, संक्रमण आणि चंद्राच्या पृष्ठभागावर वितरणासाठी अ‍ॅस्ट्रोबोटिकला टास्क ऑर्डर दिली आहे. नासाच्या कमर्शियल लुनार पेलोड सर्विसेस (सीएलपीएस)च्या उपक्रमाचा भाग म्हणून नासाने वायपरच्या चंद्रावरील प्रक्षेपण, संक्रमण आणि चंद्राच्या पृष्ठभागावरील त्याच्या उतरण्याचे नियोजन केले आहे.

चंद्रावर एकदा व्यवस्थित लँड झाल्यावर रोव्हर त्याच्या खास चाकांचा उपयोग करुन चंद्राच्या पृष्ठभागावर, तेथील खड्ड्यांमधून विहार करु शकेल, असे नासाने स्पष्ट केले. वायपर रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर ‘तीन लुनार दिवस’ (पृथ्वीवरील शंभर दिवस) वास्तव्य करु शकणार आहे. चंद्रावरील जास्तीत जास्त माहिती गोळा करण्यासाठी वायपर रोव्हरच्या वैज्ञानिक क्षमता वाढवण्यात आल्या आहेत.

वायपरवर काय असेल?

वायपर चार प्रमुख उपकरणे घेऊन चंद्रावर उतरेल. यात रेगोलिथ आणि आईस ड्रिल एक्सप्लोरिंग न्यू टेरिनेन्स (ट्रायडेंट) हॅमर ड्रिल, मास स्पेक्ट्रोमीटर ऑब्झर्विंग लूनार ऑपरेशन्स (एमसोलो) इन्स्ट्रुमेंट, नियर इन्फ्रारेड व्होलाटाइल स्पेक्ट्रोमीटर सिस्टम (एनआयआरव्हीएस) आणि न्यूट्रॉन स्पेक्ट्रोमीटर सिस्टम (एनएसएस) यांचा समावेश आहे. चंद्रावरील कथित बर्फाचा शोध घेऊन त्याचे उत्खनन करण्यासाठी या सामग्रीचा उपयोग होणार आहे.

The United States National Aeronautics and Space Administration is planning to search for water and other resources on the moon in 2023. The US agency will send its first mobile robot to the Moon in search of ice and other resources on it.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात