पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदनामीचा कट, न्यूयॉर्क टाईम्सचे बनावट पान तयार करून सोशल मीडियावर केले व्हायरल


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदनामीसाठी देशातील लिबरल्सनी व्यापक कट आखला आहे. प्रामुख्याने परदेशी माध्यमांच्या फेक न्यूज भारतात पसरविल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांचा कंठ दाटून आला होता. मात्र, ‘मगरीचे अश्रू’ असे म्हणून त्यावर टीका केली जात आहे. अगदी न्यूयॉर्क टाईम्सचे बनावट पान तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे. Prime Minister Narendra Modi’s defamation plot goes viral on social media by creating fake New York Times page


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बदनामीसाठी देशातील लिबरल्सनी व्यापक कट आखला आहे. प्रामुख्याने परदेशी माध्यमांच्या फेक न्यूज भारतात पसरविल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांचा कंठ दाटून आला होता. मात्र, ‘मगरीचे अश्रू’ असे म्हणून त्यावर टीका केली जात आहे. अगदी न्यूयॉर्क टाईम्सचे बनावट पान तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे.

सोशल मीडियावर काही जणांकडून न्यूयॉर्क टाईम्सचे पहिले पान व्हायरल केले जात आहे. यामध्ये एका मगरीचा मोठा फोटो असून डोळ्यात अश्रू आहेत. इंडियाज पीएम क्राईड (भारताचे पंतप्रधान रडले) अशी ओळही दिली आहे. हे पान व्हायरल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी केली जात आहे.



भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी या संतापजनक प्रकारावर टीका केली आहे. अमेरिकेतील माझ्या मित्रांशी मी बोललो. मात्र, अशा प्रकारचा कोणताही फोटो छापला नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ही फेक न्यूज असून आता ट्विटरने दोषींवर कारवाई करायला हवी, अशी मागणी डॉ. स्वामी यांनी केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागातील फ्रंटलाईन वर्क्स बरोबर संवाद साधला होता. यावेळी, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांबद्दल बोलताना मोदी भावूक झाले होते. या महामारीने आपल्या जवळील माणसं नेली आहेत. त्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, असे म्हणताना मोदी यांचा कंठ दाटून आला होता.

मात्र, पंतप्रधानांच्या या संवेदनशिलतेचेही राजकारण करून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. मात्र, ही टीका करताना आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिमा मलिन करण्याचाही कट रचला जात आहे. याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Prime Minister Narendra Modi’s defamation plot goes viral on social media by creating fake New York Times page

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात