मी काशीचा सेवक …!थरथरता आवाज आणि डोळ्यात दाटलेलं आभाळभर दुःख …पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अश्रू अनावर


  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी आपल्या संसदीय मतदारसंघ वाराणसीतील डॉक्टरांशी कोरोनाबाबत चर्चा केली. यावेळी पंतप्रधान मोदी   भावनिक झाले. डॉक्टरांशी बोलताना पीएम मोदी म्हणाले की या विषाणूंमुळे आपण अनेक प्रिय व्यक्ती गमावल्या आहेत .

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाराणासी येथीस डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्फाफ शिवाय इतर फ्रंटलाईन वर्कर्स यांच्याशी संवाद साधला. यावेळी मी काशीचा सेवक असल्याच्या नात्यानं काशीनिवासींचे सहृदय आभार मानतो असं म्हणत त्यांनी कोरोना काळात डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका चालक यांनी जे काम या काळात केलं आहे ते प्रशंसनीय असल्याचं म्हणत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.

  • जहाँ बीमार वहीं उपचार हा आपला यापुढचा मंत्र असणार आहे.I am a servant of Kashi …! Trembling voice and deep sorrow in eyes … Prime Minister Narendra Modi sheds tears

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वाराणसी येथील डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफसोबत संवाद साधला. फ्रंटलाईन वर्कर्ससोबतही संवाद साधला. यावेळी मी काशीचा सेवक असल्याचा नात्याने काशी निवासींचे सहृदयतेने आभार मानतो तसंच कोरोना काळात डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, रूग्णवाहिका चालक यांनी जे काम या काळात केलं ते प्रशंसनीय आहे असअ पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले .या सर्वांचे दुःख जाणून घेत थरथरत्या आवाजात पंतप्रधानांनी त्यांचे सांत्वन केले .सांत्वना देताना त्यांच्या डोळ्यातले दुःख स्पष्ट दिसत होते..त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली .

जवळच्या अनेक लोकांना आपण या काळात गमावलं आहे. हे वाक्य जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चारलं तेव्हा ते भावनाविवश झाले होते. त्यांना आपल्या मनातल्या भावना आवरणं कठीण झालं त्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भावूक रूप सगळ्यांसमोर पुन्हा आलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यापासून दुरावलेल्या सर्वांनाच आदरांजली वाहिली.

कोरोनाशी आपण आजवर जो काही लढा दिला आहे ती तुम्हा सगळ्यांची तपश्चर्या आहे. सगळ्या देशाने दाखवलेल्या धैर्याचं कौतुक होतं आहे. जहाँ बीमार वहीं उपचार हा आपला यापुढचा मंत्र असणार आहे याचीही आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्यांना करून दिली. या ओळीचाच आधार घेऊन मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करून त्या ठिकाणी गावांतील घरोघरी औषध पोहचवण्याच्या उपक्रमाचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं.I am a servant of Kashi …! Trembling voice and deep sorrow in eyes … Prime Minister Narendra Modi sheds tears

सदरचा उपक्रम हा ग्रामीण भागात जास्तीत जास्त प्रमाणात व्यापक पद्धतीनं राबवण्यात यावा यासाठी ते आग्रही दिसले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांचं प्रमाण हे दुपटीनं वाढलं आहे. अनेक दिवसांसाठी रुग्णांना रुग्णालयातच रहावं लागत आहे, अशा परिस्थितीमध्ये बनारसमध्ये अनेक आरोग्य सुविधांचं केंद्र, या दृष्टीनं पाहिलं जातं. त्यातच इथंही कोरोनामुळं अनेक आव्हानं उभी राहिली. पण, यामध्येगी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने आपला स्वत:चा विचार न करता दिवस-रात्र एक करत कामं केली. वैयक्तिक अडचणी दूर लोटत ही मंडळी कार्यरत राहिली, असं म्हणत त्यांच्या कार्यामुळंच आज बनारसला आधार मिळाला आहे हा मुद्दा त्यांनी उचलून धरला.

अतिशय कमी वेळात कोरोनासाठी गरजेच्या असणाऱ्या आरोग्य सुविधा एकवटत त्या रुग्णांच्या सेवेत देणाऱ्या बनारसवर यावेळी पंतप्रधानांनी स्तुतीसुमनं उधळली. दुकानं, बाजारपेठा बंद करत काशीमध्ये लोकांनी नफ्याचाच विचार न करता कोरोना काळात समाजसेवेला प्राधान्य दिल्याबद्दल मोदींनी सामाजिक भान जपणाऱ्या प्रत्येकाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

I am a servant of Kashi …! Trembling voice and deep sorrow in eyes … Prime Minister Narendra Modi sheds tears

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती