राहूल गांधी खोट बोलून अफवा पसरवितात, लोकांचे आयुष्य धोक्यात टाकताहेत, शिवराजसिंह चौहान यांची टीका


राहूल गांधी खोटं बोलून अफवा पसरवतात, लोकांचं आयुष्य धोक्यात टाकताहेत अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे.Rahul Gandhi spreads lies, endangers people’s lives, criticizes Shivraj Sinh Chouhan


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राहूल गांधी खोटं बोलून अफवा पसरवतात, लोकांचं आयुष्य धोक्यात टाकताहेत अशी टीका मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे.खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली असून, त्यानंतरच मन की बात करा, असं म्हटले होते.

फक्त प्रत्येक देशवासीयांपर्यंत लस पोहोचवा, मग हवे असल्यास मन की बात पण सांगा, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. यावर चौहान यांनी यांनी राहुल गांधींना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांध हे गैरसमज आणि अफवा पसरवण्याचं करत आहेत. कोरोना लसीकरणाबाबत ते करत असलेली विधानं हा देशातील कोट्यवधी नागरिकांच्या जिवाशी खेळ आहे, असे त्यांनी म्हटले आहे.



चौहान म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लसीकरण पुरवत आहेत आणि दुसरीकडे राहुल गांधी अफवा पसरवून देशातील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत

लसीकरण मोहीमेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला कोरोना टास्क फोर्सचे अधिकारी व पीएमओ उपस्थित होते. पंतप्रधानांनी आतापर्यंतच्या लसींची उपलब्धता आणि येत्या काही महिन्यांत राज्यांना लसींचा पुरवठा यासह अनेक माहिती घेतली. लसीची संपूर्ण व्यवस्था हातात घेतल्यानंतर केंद्र सरकारला लसीकरणाचा वेग वाढवायचा आहे. सरकारला यावर्षी डिसेंबरपर्यंत देशातील संपूर्ण लोकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे.

Rahul Gandhi spreads lies, endangers people’s lives, criticizes Shivraj Sinh Chouhan

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात