राहूल गांधींना आठवेना सर्व मोदी चोर आहेत म्हटल्याचे, म्हणाले हा तर फक्त राजकीय टोमणा होता


सर्व मोदी चोर आहेत, या विधानाबाबत आता जास्त काही आठवत नाही, पण कोणत्याही समुदाय वा समाजासाठी हे म्हटलेलं नव्हतं. निवडणूक प्रचाराच्या काळात राजकीय टोमणा लगावला होता,असे राहूल गांधी यांनी न्यायालयात म्हटले आहे.Rahul Gandhi has said that all Modis are thief, he said, it was just a political joke


विशेष प्रतिनिधी

अहमदाबाद : सर्व मोदी चोर आहेत, या विधानाबाबत आता जास्त काही आठवत नाही, पण कोणत्याही समुदाय वा समाजासाठी हे म्हटलेलं नव्हतं. निवडणूक प्रचाराच्या काळात राजकीय टोमणा लगावला होता,असे राहूल गांधी यांनी न्यायालयात म्हटले आहे.

सर्व मोदी चोर आहेत्, असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी २०१९मध्ये एका प्रचारसभेत केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधींनी केलेल्या या विधानावर आक्षेप घेण्यात आला होता. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला होता.



भाजपा आमदाराने दाखल केलेल्या या खटल्याप्रकरणी राहुल गांधी यांनी न्यायालयात हजर राहून आपली भूमिका मांडली.याबाबत कॅमेरामॅनचा जबाब नोंदवण्याची मागणी याचिकाकत्यार्ने केली होती. ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली

. याप्रकरणी पुढील सुनावणी १२ जुलै रोजी होणार आहे. सूरत न्यायालयात हजर होण्यापूर्वी राहुल गांधी एक ट्विट केलं होतं. ज्यात म्हटलं होतं की, अस्तित्वाचं रहस्य हेच आहे की, कोणत्याही प्रकारची भीती नसावी.

राहुल गांधी यांनी २०१९मध्ये केलेल्या या विधानावर आक्षेप घेत गुजरातमधील भाजपाचे आमदार पूर्णश मोदी यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात सारे मोदी चोर आहेत, असं म्हटलं असून, यातून समाजाचा अवमान केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केला होता. पूर्णेश मोदी यांची याचिका सूरत न्यायालयाने स्वीकारली होती. त्यानंतर राहुल गांधी यांना न्यायालयाने समन्स बजावले होते.

Rahul Gandhi has said that all Modis are thief, he said, it was just a political joke

महत्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात