नेहरू – पटेलांचे नाव घेत मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्लांचा ५ ऑगस्ट २०१९ पूर्वीचाच सूर; ३७० कलमासाठी संघर्ष करण्याची मांडली भूमिका


वृत्तसंस्था

नवी दिल्ली – जम्मू – काश्मीरसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक सकारात्मक वातावरणात झाली असली, काश्मीरमधल्या दोन राजकीय घराण्यांच्या प्रतिनिधींनी आपला जूनाचा सूर आळवला. जम्मू – काश्मीरला ५ ऑगस्ट २०१९ पूर्वीचा दर्जा प्राप्त करून देण्याची मागणी ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांनी केली. यावेळी मेहबूबा मुफ्तींनी पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेलांचे नाव घेऊन पंतप्रधानांना काश्मीरींच्या वेगळ्या दर्जाची आठवण करून दिली. Article 370 in J&K as it’s a matter of our identity. We didn’t get it from Pakistan, it was given to us by our country, by JL Nehru, Sardar Patel: Mehbooba Mufti, PDP

या दोन्ही नेत्यांनी राज्यात लोकशाही प्रक्रिया लवकर सुरू करण्याची मागणी तर केलीच पण ५ ऑगस्ट २०१९ पूर्वीच्या म्हणजे ३७० कलम आणि ३५ ए कलमाच्या मागणीवर हे दोन्ही नेते अडून बसले. जम्मू – काश्मीरच्या जनतेने ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय स्वीकारलेला नाही. आम्ही कायदा हातात घेणार नाही. पण लोकशाही मार्गाने आणि न्यायाच्या मार्गे संघर्ष करीत राहू. त्याला कितीही दिवस किंवा कितीही वर्षे लागली तर चालतील. कारण ३७० कलम आणि ३५ ए ही आमची ओळख आहे. ती काश्मीरींना पाकिस्तानने मिळवून दिलेली नाही. तर जवाहरलाल नेहरू आणि सरदार पटेलांनी ती ओळख आम्हाला मिळवून दिली आहे, अशी आठवण मेहबूबा मुफ्ती यांनी सर्व पक्षीय बैठकीत करवून दिली.



केंद्र सरकार पाकिस्तानशी चर्चा करून शस्त्रसंधी करू शकते. तर व्यापार का नाही सुरू करू शकत, असा सवाल मेहबूबा यांनी केला. भारत – पाकिस्तान यांच्यातील व्यापार हा काश्मीरी युवकांसाठी मोठा रोजगार उपलब्ध करून देतो, असे प्रतिपादन मेहबूबा मुफ्ती यांनी केले.

ओमर अब्दुल्ला यांनी देखील ३७० कलमाच्याच मुद्द्यावर जोर दिला. हा लढा आम्ही न्यायालयात लढू, असे ते म्हणाले. जम्मू – काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देऊन प्रशासनातले जम्मू – काश्मीर केडर पुन्हा बहाल करण्याची मागणी ओमर अब्दुल्ला यांनी केली. ३७० कलम हटवताना राज्य आणि केंद्र संबंधांना तडा गेल्याचे आम्ही पंतप्रधानांना सांगितले, असे ते म्हणाले.

Article 370 in J&K as it’s a matter of our identity. We didn’t get it from Pakistan, it was given to us by our country, by JL Nehru, Sardar Patel: Mehbooba Mufti, PDP

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात