ओबीसी आरक्षणावरून नणंद- भावजयांत जुंपली, रोहिणी आणि रक्षा खडसे आमने-सामने


ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता खडसे नणंद-भावजयीत जुंपली आहे.  पूर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? असा सवाल केला आहे. त्यावर ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसेंना संधी मिळाली नसती, असा टोला रक्षा खडसे यांनी लगावला आहे.Uddhav Thackeray Chief Minister and two Deputy Chief Ministers of BJP !, Discussion of early political earthquake in Maharashtra


विशेष प्रतिनिधी

जळगाव : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आता खडसे नणंद-भावजयीत जुंपली आहे.  पूर्वाश्रमीचे भाजप आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? असा सवाल केला आहे.

त्यावर ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसेंना संधी मिळाली नसती, असा टोला रक्षा खडसे यांनी लगावला आहे. ओबीसी आरक्षणावरुन खडसे यांच्या कन्या आणि खडसे यांच्या सुनबाई यांच्यातच आरोप-प्रत्यारोप सुरु झालाय.



रोहिणी खडसे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्या आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा आहेत. रक्षा खडसे या भाजपच्या खासदार आहेत.रोहिणी खडसे यांनी ओबीसी नेतृत्व संपवणाºया भाजपला आताच ओबीसींची कळवळा कसा आला? असा सवाल केलाय. त्यावर भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर आमच्यासारख्या ओबीसींना संधी मिळाली नसती. रक्षा खडसे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळालं नसतं, असं उत्तर रक्षा खडसे यांनी दिलंय.

रोहिणी खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यांदाच थेट हल्ला केलाय. त्यांनी ट्विट करत फडणवीसांना रोकडा सवाल केलाय. भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता? आता गळा काढण्यात अर्थ नाही, असे म्हटले आहे.

एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी पावलोपावली त्रास दिला, क्षणाक्षणाला छळलं, प्रसंगी पक्षातून बाहेर जाण्यासंबंधीचं पाऊल उचलावं लागलं, अशी थेट टीका स्वत: एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडताना केली होती. ओबीसी नेतृत्व डळमळीत करण्याचं कामही फडणवीसांनी अनेकदा केल्याचं खडसेंनी म्हटलं. याचाच संदर्भ रोहिणी खडसे यांच्या या ट्विटला आहे.

Uddhav Thackeray Chief Minister and two Deputy Chief Ministers of BJP !, Discussion of early political earthquake in Maharashtra

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात