‘ राज्याने गडकरींचा आदर्श घ्यावा’:भाजपच्या खासदार रक्षा खडसे यांनी नाथाभाऊंचे आरोप फेटाळले


 

रेमडेसीवीर इंजेक्शनचं राजकारण चांगलंच तापलं असतांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकनाथ खडसे यांनी कुत्र्या मांजरासारखं विरोधी पक्षांनं वागू नये. अशी टीका केली होती .तर त्यांना रक्षा खडसे यांनी उत्तर दिले आहे. 


विशेष प्रतिनिधी 

जळगाव : केंद्रासंदर्भात ते नाथाभाऊंचं मत आहे ते त्यांनी मांडलं आहे. कोरोना रोखण्यासंदर्भात प्रत्येक पक्ष आपापल्या परिने काम करीत आहे. भारतीय जनता पार्टीचे काम हे जनतेसाठीच आहे. शासनासोबत आमची जी अनबन होतेय ती जनतेसाठीच होत आहे आमच्या स्वार्थासाठी नाही अशा शब्दात भाजपाच्या खासदार रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांच्या आरोपाला उत्तर दिले आहे. Daughter in law and BJP MP Raksha khadse answer to Eknath khadse

त्यांनी ही वेळ राजकारणाची नसून मदत करण्याची आहे. आहे असा सल्ला दिला आहे.रक्षा खडसे या भाजपच्या खासदार असून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या सून आहेत.

राज्याने गडकरींचा आदर्श घ्यावा !

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी गडकरींनी राज्य सरकारवर कोणताही आरोप न करता राजकारण केलं नाही, केंद्र आणि राज्य सरकारशी समन्वय साधून कोरोना आटोक्यात आणण्यात मोठा वाटा उचलला आहे.

गडकरींचा हा आदर्श राज्यसरकारनं घ्यायला हवा तसंच ही वेळ राजकारणाची नसून केंद्र आणि राज्य सरकारनं समन्वय साधला पाहिजे. तो का साधला जात नाही. असा सवाल भाजप खासदार रक्षा खडसे यांनी आघाडी सरकारला केला आहे .

राज्य सरकाला हवी तेवढी मदत केंद्र सरकारने केली आहे. राज्यात ऑक्सीजनची कमतरता होती. मात्र आता केंद्र शासनाच्याच माध्यमातून रेल्वेद्वारे ऑक्सीजनची व्यवस्था झालेली आहे. केंद्राला दुजाभाव करायचा असता तर एवढ्या मोठ्या व्यवस्था केंद्राने उभ्या केल्या नसत्या.

कोरोना रोखण्याचे श्रेय कुणालाही घ्यायचे नाहीये. राज्य सरकारही आपापल्या परिने काम करीत आहे. आपल्या राज्य सरकारने २५ वर्षावरच्यांना लसीकरण करण्याची मागणी केंद्राकडे केली होती. केंद्र सरकारने १८ वर्षाच्या वरील सगळ्यांना १ मे पासून लसीकरणाला परवानगी दिली आहे. केंद्र सरकार कोणतेही राजकारण करीत नाही असेही खा. रक्षा खडसे यांनी स्पष्ट केले.

पीएम केअर फंड मधून राज्यभरातील जिल्ह्यात व्हेंटिलेटर दिले आहेत. त्यातील अनेक नादुरुस्त याकडे सरकार आणि प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. असं ही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

Daughter in law and BJP MP Raksha khadse answer to Eknath khadse

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात