गरीबी हटाव आईच्या मृत्यूची सहानभूती यावर “ते” निवडणुका जिंकायचे; हरियाणाच्या गृहमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य


वृत्तसंस्था

चंडीगड : उत्तर प्रदेश उत्तराखंड यांच्यासह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत कोणीही काहीही म्हटले तरी भारतीय जनता पार्टीचाच विजय होईल, असा दावा हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी केला आहे. मात्र त्याच वेळी त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य देखील केले आहे. Poverty Alleviation “They” won the election on the sympathy of the mother’s death

पत्रकारांशी बोलताना अनिल विज म्हणाले, की पूर्वी भावना भडकावून लोकांकडून मते मिळवली जायची. कोणी गरीबी हटावचा नारा देत 2 – 3 निवडणुका जिंकल्या. त्यानंतर कुणी आले आणि माझी आई मरण पावली आहे मला मते द्या, असे म्हणून निवडणुका जिंकल्या. परंतु आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली आहे. त्यामुळे आता फक्त विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका होतील आणि जिंकल्या जातील, असे अनिल विज म्हणाले.

गरीबी हटावचा नारा दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1971 च्या निवडणुकीच्या वेळी दिला होता, तर 1985 मध्ये राजीव गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर निवडणूक लढवली होती. त्यावेळी सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेस लोकसभेची निवडणूक प्रचंड फरकाने जिंकली होती. या संदर्भात अनिल विज यांनी वक्तव्य केले आहे. मात्र त्यावरून आता राजकीय वर्तुळात वादंग उठण्याची शक्यता आहे.

Poverty Alleviation “They” won the election on the sympathy of the mother’s death

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात