बॉलिवूड अभिनेते अरुण वर्मा यांची प्राणज्योत मालवली ,आज संध्याकाळी अंत्यसंस्कार केले जाणार


अरुण वर्मा यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या होत्या.त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता.Bollywood actor Arun Verma will be cremated this evening


विशेष प्रतिनिधी

भोपाळ : बॉलिवूड अभिनेते अरुण वर्मा यांचे वयाच्या 62 व्या वर्षी दीर्घ आजाराने भोपाळमध्ये निधन झाले.त्याच्यावर पीपल्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्यावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.अरुण वर्मा यांच्या मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या होत्या.त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता.

त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली गेली.मात्र त्याचं फुफ्फुस निकामी झालं. हळूहळू त्यांनी उपचारांना प्रतिसाद देणं कमी केलं आणि अखेर आज त्यांचं निधन झालं.तसेच CINTAA या संस्थेने अरुण वर्मा यांच्या उपचारासाठी 50 हजारांची मदत केल्याची माहिती आहे. अशा अनेक समाजसेवी संस्थांनी त्यांच्या उपचारासाठी मदत केली आहे.अरुण वर्मा यांचे सिनेमे

अरुण वर्मा हे मूळचे भोपाळचे रहिवासी असून, त्यांनी अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सलमान खान आणि संजय दत्त यांच्यासह अरुण वर्मा यांनी अनेक मोठ्या नावांसोबत काम केले.त्यांनी 80 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केल्याची माहिती आहे.

‘डकैत’ या हिंदी चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. खलनायक, नायक, प्रेम ग्रंथ. हिना, मुझसे शादी करोगी, हिरोपंती, या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं.नुकतंच त्यांनी कंगना रनौतची निर्मिती असलेल्या टिकू वेड्स शेरू या चित्रपटात काम केलं.

अभिनेता आणि कॉमेडियन उदय दहिया यांनी अरुण वर्मा यांच्या निधनाची बातमी जाहीर केली. ‘मला हे सांगताना अत्यंत दुःख होतंय की माझे मित्र अरुण वर्मा यांचं भोपाळमध्ये निधन झालं. ओम शांती’, अशी पोस्ट उदय दहिया यांनी केली आहे.

Bollywood actor Arun Verma will be cremated this evening

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात