जळगाव : आमदार राजूमामा भोळे यांच्यासह दहा पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल


भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार १९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता बळीराम पेठ येथील भाजपा कार्यालयापासून ते टॉवर चौकात मोर्चा काढला.Jalgaon: Crime filed against MLA Rajumama Bhole and ten other office bearers


विशेष प्रतिनिधी

जळगाव : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.दरम्यान या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार १९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता मोर्चा काढला.

हा मोर्चा बळीराम पेठ येथील भाजपा कार्यालयापासून ते टॉवर चौकात काढण्यात आला.त्यानंतर टॉवर चौकात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक बॅनर जाळून आंदोलन केले होते.



दरम्यान जळगाव शहरातील टॉवर चौक येथे भाजपाने जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी आमदार राजूमामा भोळे यांच्यासह भाजपाच्या दहा पदाधिकाऱ्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार करीत आहे.

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नरेंद्र ठाकरे यांच्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक प्रभाकर सुर्यवंशी, सचिन पवार, राजेश भावसार, लालंद पाटील, तुकाराम निकम, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह दहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Jalgaon: Crime filed against MLA Rajumama Bhole and ten other office bearers

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!