प्रतिनिधी
नवी दिल्ली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून यंदा प्रजासत्ताक दिनाची परेडसुद्धा खास असणार आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त दिल्लीच्या राजपथावर पहिल्यांदाच 75 विमाने उड्डाण करताना दिसणार आहेत. यामध्ये 5 राफेल विमानांचा समावेश असणार आहे. सोबतच, पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी निमंत्रितांच्या यादीमध्ये ऑटोरिक्षा चालक, बांधकाम कामगार, स्वच्छता कामगार आणि अन्य कामगार यांचा समावेश करण्यात आला आहे.Rickshaw pullers, cleaners in the list of Republic Day guests
यंदा प्रजासत्ताक दिनाची परेड अर्धा तास उशिराने गाझीपूर मध्ये बॉम्ब सापडल्याने दक्षता
संरक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ज्यांना कधीही प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पाहण्याची संधी मिळत नाही, त्यांना संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या यादीत ऑटोरिक्षा चालक, बांधकाम कामगार, स्वच्छता कामगार आणि अन्य कामगार यांचा समावेश आहे.
दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढतोय. वाढत्या रूग्णांची संख्या पाहता या वर्षी दिल्लीत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान केवळ 24 हजार लोकांच्या उपस्थितीला परवानगी दिली जाणार आहे. यावर्षी परेड दरम्यान उपस्थित असलेल्या सुमारे 24 हजार लोकांपैकी 19 हजार लोकांना आमंत्रित केले जाणार आहे. तसेच जे तिकीट विकत घेऊ शकतील असे सामान्य नागरिक उपस्थित असतील. परेड दरम्यान कोविड-19 शी संबंधित सर्व नियमांचे पालन केले जाईल. लोकांच्या बसण्याची व्यवस्था करताना सामाजिक अंतराचे नियम पाळले जाणार आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App