राज कुंद्राचे हॉटशॉटसच नव्हते तर बालाजी टेलिफिल्मस, व्हुट, एमएक्स प्लेअर, उल्लू, कोकू, देसीफिक्स, प्राईमफ्लिक्स, गुपचूप, फ्लिझमोव्हवरही अश्लिल व्हिडीओ, आशिष शेलार यांचे अमित शहा यांना पत्र


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज कुंद्रा याचे हॉटशॉटस नव्हे तर बालाजी टेलिफिल्मस, व्हुट, एमएक्स प्लेअर, उल्लू, कोकू, देसीफिक्स, प्राईमफ्लिक्स, गुपचूप, फ्लिझमोव्ह यासारख्या प्लॅटफॉर्मवरही अश्लिल व्हिडीओ आहे. संयुक्त टास्कफोर्स करुन सर्व अश्लील प्लॅटफॉर्मची झाडाझडती घ्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.Not only Raj Kundras Hotshot, Balaji Telefilms, VOOT, MX Player, Ullu, Kooku, DesiFlix, Hot Shots, Primeflix, GupChup, Flizmov has alsoPornographic videos, Aashish Shelar demand action from Central Home Minister

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठविलेल्या पत्रात आशिष शेलार यांनी म्हटले आहे की, मोठ्या फिल्म प्रोडक्शन कंपन्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर थोड्या प्रमाणात कुठल्याही नियंत्रणाशिवाय तथाकथित प्रौढ किंवा अश्लील चित्रपट सामग्री तयार करतात.सीबीआय, ईडी, आय अँड बी, आयटी मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि एमसीएची एक संयुक्त टास्कफोर्स तयार करुन अशा सर्व अश्लील ओटीटी अ‍ॅप्स आणि वेबसाईट्सची झाडाझडती घेण्यात यावी. तसेच पॉर्न वेबसाईट्स ब्लॉक करण्यासाठी आणि अशी सर्व अ‍ॅप्ससाठी कठोर नियमावली आयटी मंत्रालयाला विकसित करण्याचे निर्देश देण्यात यावेत.

राज कुंद्रा कंपनीतर्फे चालवले जाणारे अश्लील अ‍ॅप सबस्क्राईब रेव्हेन्यू म्हणून दरमहा 20 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न कमवत आहे, असा आरोप करण्यात येतो आहे. होतकरू तरुण तरुणींचे शोषण करून दबाव आणून हे व्हिडीओ तयार केली गेली होती.

अशा 40 हून अधिक बेकायदेशीर अश्लील अ‍ॅप्स आणि वेबसाईट्स सदस्यत्वातून शेकडो कोटींची कमाई करतात. या सगळ्यातून तरुण पिढीवर, किशोरवयीन मुलांवर विपरीत परिणाम होत आहेत. तसेच ते नकारात्मकतेने घेरले आहे, असेही शेलार यांनी म्हटले आहे.

शेलार म्हणाले, महाराष्ट्रात 2019 पासून 15,000 पेक्षा जास्त बाल अश्लील क्लिप अपलोड चाईल्ड पॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचेही दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत 2019 पासून 15,000 पेक्षा जास्त बाल अश्लील क्लिप अपलोड केल्या गेल्या. 213 एफआयआर नोंदवण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. सन 2017 पासून 2019 पर्यंत पॉस्को प्रकरणात 45 टक्के वाढ झाली आहे..

नागरिकांना अशी सर्व प्रकरणांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी केंद्रीय पातळीवर पॉर्न आणि चाईल्ड पॉर्न हेल्पलाईन सुरु करण्यात यावी. त्याबाबतची माहिती वेळोवेळी सोशल मीडिया हँडलसी देण्यात यावी. तसेच सर्व ओटीटी वरील फिल्म, वेबसिरीज सेन्सॉर बोर्डाच्या नियमात आणण्याबाबत विचार करण्यात यावा.

गंभीर बाब म्हणजे ड्रग्ज माफिया आणि या अश्लीलतेचा व्यापार करणाºया माफियांचे साटेलोटे असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे त्याचाही कसून तपास करण्यात यावा, अशा मागण्या शेलार यांनी केल्या आहेत.

Not only Raj Kundras Hotshot, Balaji Telefilms, VOOT, MX Player, Ullu, Kooku, DesiFlix, Hot Shots, Primeflix, GupChup, Flizmov has alsoPornographic videos, Aashish Shelar demand action from Central Home Minister

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”