WATCH :नारायण राणे यांचे जल्लोषात स्वागत कणकवलीत जन आशीर्वाद यात्रा जल्लोषात


विशेष प्रतिनिधी

कणकवली : नारायण राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या कणकवलीत जन आशीर्वाद यात्रेचे जल्लोषात, ढोल आणि ताशाच्या गजरात स्वागत केले गेले.नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत यांनी यात्रेचे स्वागत केले. सिंधुगर्जना ढोल पथकाचे सादरीकरण लक्षवेधी ठरले.Narayan Rane Welcomed in home town Kankavali

यावेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण,आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, नीलम ताई राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत,यात्रा प्रमुख प्रमोद जठार आदी उपस्थित होते.कार्यकर्त्यांमध्ये अमाप उत्साह…

कणकवलीत मंत्री राणे येणार असल्याने शुक्रवारी सायंकाळी ८ वाजल्यापासून पटवर्धन चौकात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.मोठ्या संख्येने गर्दी त्यात ढोल पथकाची साथ ,आनंदाने कार्यकर्त्यांनी ढोलाच्या तालावर ठेका धरला होता.भारतीय जनता पक्षाचे झेंडे कार्यकर्ते अमाप उत्साहात फिरवत होते. हा उत्साह रात्री उशिरापर्यंत तसाच होता.अखेर केंद्रीय मंत्री राणेंचे आगमन झाले आहे.

  •  सिंधुगर्जना ढोल पथकाचा लक्षवेधी अविष्कार
  • ढोल आणि ताशाच्या गजरात स्वागत
  • पटवर्धन चौकात कार्यकर्त्यांनी गर्दी
  • नारायण राणे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी
  • ढोलाच्या तालावर कार्यकर्त्यांचा ठेका
  • भारतीय जनता पक्षाचे झेंडे फडकले
  • कार्यकर्त्यांचा उत्साह रात्री उशिरापर्यंत कायम

Narayan Rane Welcomed in home town Kankavali

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था