सूक्ष्म, लघू खात्यांना कितीसा निधी मिळणार? विचारणाऱ्या अजित पवारांचे अज्ञान नारायण राणेंनी पाडले उघडे…!!


प्रतिनिधी

सिंधूदुर्ग – सुक्ष्म, लघू खात्याला निधी कितीसा मिळणार?, निधी गडकरी साहेबांनी दिला आहे. त्यातून कामे सुरू आहेत, असा टोला केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री मंत्री नारायण राणे यांना लगावणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अज्ञान नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत उघडे पाडले. माझ्या खात्याला केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडून ४.५ लाख कोटी रूपये निधी मिळतो, अशी आठवण नारायण राणे यांनी करून दिली.Narayan Rane targets Ajit Pawar over MSME allotment of budget… MSME get 4.5 lac cr from central budget

काल पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले होते, की “सूक्ष्म, लघू खात्यांमध्ये कितीसा निधी मिळणार? निधी द्यायचा तर गडकरी साहेबांचे मंत्रालय देऊ शकते. गडकरी साहेबांच्या निधीतून कामे चालली आहेत. त्या खात्याचे पूर्वी नाव “अवजड” होते. काहीजण त्याला गंमतीने “अवघड” खाते म्हणायचे. पण आता त्याच्या नावात बदल झालेत.”



अजित पवारांच्या वरील वक्तव्याला प्रत्युत्तर देताना नारायण राणे म्हणाले, की “अजित पवार अजून अज्ञानी आहेत. माझ्या खात्याला केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून निधी मिळतो. प्रधानमंत्री योजनांना पंतप्रधान निधी देतात. या योजनांना एकाच वेळी ४.५ लाख कोटींचा निधी दिला होता. त्यातील ३ लाख कोटी खर्च झालेत. १.२५ लाख कोटी २५ लक्ष शिल्लक आहेत. त्यातून कामे चालू आहेत.”

या पुढे जाऊन देखील नारायण राणे यांनी ठाकरे – पवार सरकारच्या आर्थिक स्थितीचे वाभाडे काढले. ते म्हणाले, की तुमच्या तिजोरीत पैसा आहे का? अतिवृष्टीसाठी पैसे नाहीत. पुराचा फटका बसेलल्यांना नागरिकांना, शेतकऱ्यांना एक रुपयाची मदत केलेली नाही. एसटी कामगारांना पगार दिला नाही म्हणून ते आत्महत्या करीत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर देता येत नाही त्याची चिंता अजित पवारांनी करावी, असा प्रतिटोला नारायण राणे यांनी लगावला.

Narayan Rane targets Ajit Pawar over MSME allotment of budget… MSME get 4.5 lac cr from central budget

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात