पिशवीतील दूध पिणाऱ्यांना गाईच्या दुधातील सोन्याची किंमत काय समजणार? पश्चिम बंगाल भाजपाचे अध्यक्ष दिलीप घोष यांचा सवाल


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी पुन्हा एकदा गाईच्या दुधात सोने असल्याचा दावा केला आहे. पिशवीतील पॅक दूध पिणाऱ्यांना देशी गाईच्या दुधातील सोन्याची किंमत काय समजणार असा सवालही त्यांनी केला आहे.What will be the price of gold in cow’s milk? West Bengal BJP president Dilip Ghosh’s question

घोष म्हणाले, आजकाल कोणीही गाईचे खरे दूध पीत नाही. बंगालमध्ये आता घरात गाई पाळल्या जात नाही. याचे कारण म्हणजे लोकांना त्याचे महत्व समजत नाही. प्रत्येक जण सध्या पॅकींगमधील दूध खरेदी करत आहे. पण त्यांनी लक्षात ठेवावे की ते खरे दूध नाही. जेव्हा मी गायीच्या दुधात सोन्याचे अंश असल्याचे सांगितले होते, तेव्हा अनेक लोकांनी माझ्यावर टीका केली.पण ज्यांनी कधीच खऱ्या दुधाचे सेवन केले नाही, त्यांना गाईच्या दुधातील सोन्याची किंमत कशी समजते? आपल्या वक्तव्याला परदेशात होत असलेल्या संशोधनाचा पाठिंबा असल्याचे सांगून घोष म्हणाले, माझ्या मताला विरोध करणाºया काउंटर रिसर्च पेपर तयार करून माझा प्रतिवाद करावा.

यापूर्वीही घोष यांनी देशी गायींच्या दुधात अस्सल सोनं असतं, परदेशी गायी मात्र गोमाता नसून आपल्या मावशा (आंटी) असतात, असे म्हटले होते. देशी गायींचं स्वत:चं असं वैशिष्ट्य असतं. त्यांच्या दुधात सोनं मिसळलेलं असतं. याच कारणामुळे त्यांचं दूध सोनेरी रंगाचं दिसतं. एक नाडी असते, जी सूर्यकिरणांच्या मदतीने सोनं तयार करण्यात मदत करते. म्हणून आपण देशी गायींचं जतन करायला पाहिजे. जर आपण देशी गायींचं दूध प्यायलं, तर आपण धष्टपुष्ट होऊ असेही त्यांनी म्हटले होते.

घोष यांच्या वक्तव्यावर तृणमूल कॉँग्रेसने टीका केली आहे. तृणमूलचे ज्येष्ठ मंत्री फिरहाद हकीम म्हणाले, त्यांनी सोन्याचा अंश असलेल्या गाई आणून द्याव्यात. म्हणजे त्यांच्यावर संशोधन करता येईल. दिलीप घोष हे नेहमीच बाष्कळ बोलत असतात. त्यांना कोणीही गांभिर्याने घेत नाही. त्यांनी आपला मुद्दा संशोधाने खरा असल्याचे सिध्द करावे. अन्यथा या प्रकारची विधाने करणे थांबवावे.

What will be the price of gold in cow’s milk? West Bengal BJP president Dilip Ghosh’s question

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था