आयकर विभाागाचे पोलाद उत्पादक कारखानदारावर छापे, १७५ कोटी रुपयांची अवैध संपत्ती उघड


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: आयकर विभागाने एका पोलाद उत्पादक कारखानदाराच्या महाराष्ट्र आणि गोव्यातील ४४ मालमत्तांवर छापा घालून १७५ कोटी रुपयांची अवैध संपत्ती उघड केली आहे. हा कारखानदार पुणे, नाशिक, अहमदनगर आणि गोव्याशी संबंधित आहेत.Income tax department raids steel producers, reveals illegal assets worth Rs 175 crore

आयकर विभागाने 44 हून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. छाप्यादरम्यान सर्व बनावट कागदपत्रे, बिले, इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त केले. जीएसटी प्राधिकरण पुणेच्या व्हेईकल ट्रॅकिंग अ‍ॅपद्वारे ई-वे बिलेदेखील जप्त केलीत. अद्याप या कारखानदाराचे नाव उघड झालेलं नाही.आयकर विभागाला आतापर्यंत त्या ग्रुपकडून झालेल्या १७५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे पुरावे सापडले आहेत. पुढील तपासात ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या आयकर अधिकारी घोटाळ्याच्या तपासात गुंतलेले आहेत. आतापर्यंत साडेतीन कोटी रुपयांच्या वस्तूंची माहिती आणि सुमारे 4 कोटी रुपयांच्या अतिरिक्त साठ्याची माहिती प्राप्त झालीय. मालमत्तेतील गुंतवणुकीसह 3 कोटी रुपयांची रोकड, 5.20 कोटी रुपयांचे दागिनेही वेगवेगळ्या ठिकाणाहून जप्त करण्यात आलेत.

आयकर विभागाने 1.34 कोटी रुपयांच्या 194 किलो चांदीच्या वस्तूही जप्त केल्यात. आतापर्यंतच्या तपासात 175.5 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केलीय, ज्यात दागिने आणि रोख रकमेसह बोगस खरेदी केल्याचं कागदपत्रांवरून आढळून आलंय. सध्या आयकर विभागाचे छापे आणि तपास सतत सुरू आहे.

दुसरीकडे अंमलबजावणी संचालनालयाने सरकारी मालकीच्या एमएमटीसीकडून कथित फसवणुकीशी संबंधित मनी लाँड्रिंग चौकशीच्या संबंधात एक ज्वेलरी कंपनीची 363 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. एमबीएस ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड, एमबीएस इम्पेक्स प्रायव्हेट लिमिटेड, सुकेश गुप्ता, अनुराग गुप्ता, नीतू गुप्ता, वंदना गुप्ता आणि त्यांच्या ग्रुप युनिट्सच्या 45 अचल मालमत्ता मनी लाँड्रिंग विरोधी कायद्याअंतर्गत तात्पुरत्या जप्त करण्यात आल्यात.

Income tax department raids steel producers, reveals illegal assets worth Rs 175 crore

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती