पेगाससवरून मोदी – शहांवर राहुलजींची प्रश्नांची सरबत्ती… पण संसदेबाहेर; संजय राऊतांचाही शेजारी उभे राहून पाठिंबा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पेगासस स्पायवेअरच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर प्रश्नांची अक्षरश: सरबत्ती केली पण ती संसदेत नव्हे, तर संसदेबाहेर उभे राहून…!!Modi from Pegasus – Rahulji’s barrage of questions on Shah … but outside Parliament; Support Sanjay Raut by standing next to him

काँग्रेससह सर्व विरोधी सदस्य संसदेत सातत्याने गदारोळ करून लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज स्थगित करणे भाग पाडत आहेत. परंतु, राहुल गांधी यांनी सर्व विरोधकांना एकत्र करून संसदेच्या बाहेरून मोदी – शहा यांच्यावर प्रश्नांच्या तोफा डागल्या आहेत.



पेगासस स्पायवेअर केंद्र सरकारने विकत घेतले आहे काय?, त्यांना देशातल्या सामान्य युवक, विरोधी नेते, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट न्यायाधीश यांची हेरगिरी करण्याचे कंत्राट दिले आहे काय?, मोदी आणि शहा देशातल्या लोकशाही संस्थांवर असा हेरगिरीचा हल्ला चढवत आहेत काय? या प्रश्नांची उत्तरे आम्हाला ते दोघेही देत नाहीत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी संसदेबाहेर केला.

त्यावेळी त्यांच्या शेजारी उभे राहून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील मान डोलवली. पेगासस असो की कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलन असो सर्व विरोधकांची एकजूट मजबूत आहे, असा दावा संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्या शेजारी उभे राहून केला.

यावेळी त्यांच्या समवेत द्रमुक, डाव्या पक्षांसह अन्य विरोधी पक्षांचे खासदारही होते. राहुल गांधी यांनी मोदी आणि शहा यांची नावे घेऊन ते विरोधकांवर पाळत ठेवल्याचा आरोप केला.

मोदी आणि शहा हे विरोधकांवर संसद चालू न देण्याचा आरोप करतात. परंतु पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावर आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देत नाहीत असा प्रत्यारोप राहुल गांधी यांनी केला.

पेगासस स्पायवेअरचे हत्यार माझ्याविरुद्ध, तुमच्याविरुद्ध, सर्व विरोधी पक्षांविरुद्ध, प्रसारमाध्यमंविरुद्ध वापरले गेले. मग त्यावर आम्ही प्रश्न उपस्थित करायचे नाहीत काय?, त्याची संसदेत चर्चा करायची नाही काय?, असा सवाल राहुल गांधी यांनी संसदेबाहेर उभे राहून केला.

Modi from Pegasus – Rahulji’s barrage of questions on Shah … but outside Parliament; Support Sanjay Raut by standing next to him

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात