Tokyo Olympic : पी.व्ही.सिंधूची बाद फेरीत धडक ; हाँगकाँगच्या खेळाडूवर मात


  • बाद फेरीत सिंधूसमोर डेन्मार्कच्या खेळाडूचं आव्हान.Tokyo Olympics: PV Sindhu knocked out in the knockout stage; Overcome the Hong Kong player
  • रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला रौप्यपदक मिळवून देणाऱ्या सिंधूकडून यंदाही भारतीय चाहत्यांना पदकाची अपेक्षा आहे. सिंधू देखील पदक मिळवण्यासाठी साजेसा खेळ करत आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली:भारताला सर्वाधिक आशा असणाऱ्या महिला बॅडमिंटन स्पर्धेत स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने आणखी एक विजय मिळवला आहे. सिंधूने हाँग काँगच्या चीयूंगा नगनला सरळ सेट्समध्ये नमवत हा विजय मिळवला असून सिंधूचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय आहे. या विजयासोबतच तिने बाद फेरीत जागाही मिळवली आहे.

सिंधू आणि चीयूंगा यांच्याचत झालेल्या सामन्यात सिंधूने 21-9 आणि 21-16 अशा सरळ दोन सेट्समध्ये विजय मिळवत सामना आपल्या नावे केला.केवळ 35 मिनिटं चाललेला हा सामना सिंधूसाठी स्पर्धेत आव्हान कायम ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. सिंधूकडून टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्याची सर्वाधिक आशा आहे. बॅडमिंटन खेळात तर ती एकमेव खेळाडू आहे जी यंदा पदक मिळवून देऊ शकते.

पहिल्या सामन्यात इस्रायलच्या पोलिकारपोवा कसेनियाला 21-7 आणि 21-10 अशा सरळ सेट्समध्ये नमवल्यानंतर आजचा दुसरा सामनाही सिंधूने जिंकला आहे.

जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या सिंधूला बाद फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डटचा सामना करायचा आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये सिंधूने मियाला ४ वेळा हरवलं आहे तर मिया फक्त एकदाच यशस्वी झाली आहे. थायलंड ओपन स्पर्धेत मियाने यंदाच्या वर्षी सिंधूला हरवलं होतं. आपल्या पहिल्या सामन्यात सिंधूने इस्राईलच्या क्सेनिका पोलिकार्पोवाचा पराभव केला होता.

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात सिंधूने आपल्या बॅकहँडचा सढळहस्ते वापर करत प्रतिस्पर्धी खेळाडूला चांगलंच दमवलं.

Tokyo Olympics: PV Sindhu knocked out in the knockout stage; Overcome the Hong Kong player

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात