राहुलजींची प्रेस कॉन्फरन्स, रणदीप सुरजेवाला आणि ट्रम्प नावाचा धसका


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी आज घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मोदी सरकारला सगळ्याच मुद्द्यांवर आडवे – तिडवे चोपले… पण डोनाल्ड ट्रम्प नावाचा धसका काँग्रेसजनांनी किती घेतला आहे, याचा प्रत्यय प्रेस कॉन्फरन्समध्ये आला. त्याचे असे झाले… Congress leader Rahul Gandhi responds on being asked aboutPrime Minister Modi reaction on US Capitol violence and silence on Farm protestराहुलजींना डोनाल्ड परराष्ट्र धोरणाविषयी एक प्रश्न विचारण्यात आला. त्याचे उत्तर देताना त्यांनी मोदी सरकारला परराष्ट्र धोरणाचे ज्ञान कसे नाही, मोदी कसे चुकीचे वागतात याची उदाहरणे दिली. मोदींनी अमेरिकेतील कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांचा हात उंचावून अब की ट्रम्प सरकार घोषणा कशी दिली, याचे प्रात्यक्षिक राहुलजींनी करून दाखविले.

त्यांच्या बाजूला रणदीप सुरजेवाला बसले होते. त्यांनी अचानक त्यांचा हात हातात घेऊन उंचावला आणि पत्रकारांना सांगू लागले, तुम्हाला आठवतंय का मोदी असेच म्हणाले होते ना, अब की बार ट्रम्प सरकार… राहुलजींनी असे म्हणाले मात्र, आणि वीजेचा झटका बसल्यासारखा सुरजेवालांनी आपला हात राहुलजींच्या हातातून काढून घेतला आणि म्हणाले, मी डोनाल्ड ट्रम्प नाहीए. मी ज्यो बायडेन आहे.

Congress leader Rahul Gandhi responds on being asked aboutPrime Minister Modi reaction on US Capitol violence and silence on Farm protest

अमेरिकेतल्या ट्रम्प एपिसोडनंतर त्या नावाचा सगळ्यांनीच एवढा धसका घेतला आहे की चेष्टेत जरी कोणी कोणाला ट्रम्प म्हणाले तर त्याला काहीतरी गडबड वाटते. सगळेजण त्या नावापासून दूर पळतात. रणदीप सुरजेवालांचे असेच झाले… राहुलजीच त्यांचा हात हात घेऊन उंचावत अब की बार डोनाल्ड ट्रम्प म्हणाल्याने त्यांची चांगलीच पंचाईत झाली आणि हात हातून सोडवून घेताना आपण ज्यो बायडेन असल्याचे त्यांनी सांगून स्वतःची ट्रम्प नावापासून सुटका करवून घेतली.

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी