ममतांचा शरद पवारांना धक्का; गोव्यात राष्ट्रवादीचे एकमेव आमदार चर्चिल आलेमाव तृणमूल काँग्रेसमध्ये सामील!!


वृत्तसंस्था

पणजी : आठवडाभरापूर्वीच मुंबईत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गोव्यात आज शरद पवार यांनाच धक्का दिला आहे.Mamata hits Sharad Pawar; Churchill Alemao, the only NCP MLA in Goa, has joined Trinamool Congress

गोव्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधून फोडून तृणमूल काँग्रेस मध्ये सामील करून घेतले आहे.चर्चिल आलेमाव यांनी विधानसभेचे विद्यमान सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे पत्र दिले



असून त्यामध्ये राष्ट्रवादी विधिमंडळ काँग्रेस भंग करून तिचे विलीनीकरण तृणमूल काँग्रेस मध्ये केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपल्याला इथून पुढे तृणमूल काँग्रेसचा आमदार म्हणून विधानसभेत स्वतंत्र जागा मिळावी, अशी मागणी चर्चिल आलेमाव यांनी केली आहे.

एकीकडे ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची भेट घेऊन सिल्वर उपचार पोर्चमध्ये पत्रकारांशी बोलताना संयुक्त पुरोगामी आघाडीचे अर्थात यूपीएससी राजकीय अस्तित्व पुसून टाकले. शरद पवार हे वरिष्ठ नेते आहेत अशी स्तुतिसुमने उधळली,

पण आठवडाभरानंतर ममता बॅनर्जी यांनी पवारांनाच त्यांचा आमदार कडून गोव्यात राजकीय धक्का दिला आहे. तृणमूल काँग्रेस गोव्यामध्ये मते फोडायला आलेली नाही तर भाजप विरोधकांची सर्व मते गोळा करायला आली आहे असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

Mamata hits Sharad Pawar; Churchill Alemao, the only NCP MLA in Goa, has joined Trinamool Congress

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात