WATCH : लस हवी, सिरींज घेऊन या; शिरूरमध्ये अजब प्रकार शिरूरचे नागरिक लसीकरण केंद्रात चक्रावले


विशेष प्रतिनिधी

शिरूर : शिरूर शहरात ग्रामीण रुग्णालयामध्ये लसीकरणासाठी लागणारे सिरिंज नागरिकाना बाहेरून ( मेडिकलमधून ) बेकायदेशीर पैसे देऊन आणावी लागत आहे, मगच लस देण्यात येत आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय व नागरिकांची आर्थिक व मानसिक लुट करणार आहे.- Need vaccine, bring a syringe; Strange thing in Shirur

अशा नियमबाह्य गलथान कारभाराला आळा बसावा,नागरिकांची आर्थिक-मानसिक लूट थांबावी, व सिरिंज (इंजेक्शन) हे रुग्णालयामध्ये मोफतच मिळावे, यासाठी गांधीगिरी मार्गाने निषेध नोंदवत सिरिंज बॉक्स मनसेच्यावतीने रुग्णालयाला भेट देण्यात आला..



गेल्या २ महिन्यांपासून नागरिक बाहेरून सिरिंज घेऊन यावी लागत आहे. यात मेडिकल व ग्रामीणचे अधिकारी-कर्मचारी यांचा काही आर्थिक व्यवहार चालू आहे का..? याची चौकशी व्हावी, आजपर्यंत देण्यात आलेले लसीकरण यांचे ऑडिट व्हावे,

तसेच लस घेतल्यानंतर देण्यात येणाऱ्या गोळ्या कुठे गेल्या याचा शोध घेण्यात यावा व सदर कार्यालयाची दप्तरी चौकशी व्हावी. तसेच होणारे लसीकरण नागरिकांची अडवणूक न करता,

मोफतच देण्यात यावे अशा नागरिकांशी निगडित असणाऱ्या सर्व प्रश्नावर मनसे विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष ॲड. स्वप्नील माळवे यांनी आवाज उठवला व पुढील लसीकरण काळात जर नागरिकांना सिरीन आणण्यास सांगितल्यास मनसे स्टाईलने निषेध नोंदवू असा इशारा देण्यात आला.

  • कोरोनाविरोधी लस हवी, सिरींज घेऊन या
  • शिरूर ग्रामीण रुग्णालयात अजब प्रकार
  • गेल्या २ महिन्यांपासूनचे चित्र
  • मनसे आक्रमक, चौकशीची मागणी

 Need vaccine, bring a syringe; Strange thing in Shirur

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात