लोकवर्गणीतून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शन दिलेली चिमुकल्या वेदीकाचा मृत्यू


विशेष प्रतिनिधी

पिंपरी : भोसरी येथील वेदिका सौरव शिंदे हिला झालेल्या दुर्धर आजारातून बरे करण्यासाठी  आई वडिलांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. लोकवर्गणीतून सोळा कोटी रुपये देऊन इंजेक्शन दिले. त्यानंतर बरी होऊन ती घरी आली.Vedika, who was injected after collecting Rs 16 crore from the crowd funding, died

मात्र रविवारी सायंकाळी खेळत असताना तिला अचानक श्वास घेण्यास त्रास झाला. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.काही दिवसांपूर्वी  भोसरीतील वेदीकाचे वडील सौरव शिंदे, आई व आजोबांनी  उपचारासाठी १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन परदेशातून मागवण्यासाठी मदतीचे आवाहन काही महिन्यांपूर्वी केले होते.

त्यांच्या आवाहनाला साद देत जनतेने भरभरून प्रतिसाद दिला व सर्वच थरातून तिला मदतीचा ओघ सुरू झाला. वेदीकासाठी शिरूरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनीही तिची कस्टम ड्युटी माफ करण्यासाठी व मदतीसाठी लोकसभेत आवाज उठवला.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले होते.

पंतप्रधानांनीही कस्मट ड्युटी माफ करून मानवतेतचा परिचर दिला होता. त्यानंतर वेदिकाच्या उपचारासाठी  मदतीचा ओघ सुरू झाला. १६ कोटी लोकवर्गणीतून जमा झाली. इंजेक्शन भारतात आले. पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर इंजेक्शन देऊन पुढील उपचार घेऊन वेदिका पूर्ण बरी होऊन घरी आली होती.

सगळे व्यवस्थित सुरू आहे असे वाटत असतानाच आज काळाने वेदीकवर झडप घातली.मात्र रविवारी सायंकाळी खेळत असताना तिला अचानक श्वास घेण्यास त्रास झाला. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिने अखेरचा निरोप घेतला

Vedika, who was injected after collecting Rs 16 crore from the crowd funding, died

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात