Inspiring : शेतमजुराची मुलगी बनली सीबीएसई १२ वीची टॉपर, अडचणींवर मात करत मिळवले १०० % गुण

Inspiring Farmer laborers daughter brought full 100% marks in CBSE class 12 results, wants to serve the country by becoming an IAS

Inspiring : कठोर परिश्रम केले तर यश हे हमखास मिळतच असते. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तुम्ही मनापासून मेहनत घेतली ना तर यशोशिखरावर जाण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. उत्तर प्रदेशातील बडेरा गावातील एका शेतमजुराची मुलगी अनसूया कुशवाह हिने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) 12 वीच्या परीक्षेत 100% गुण मिळवण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली. शुक्रवारीच हे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. Inspiring Farmer laborers daughter brought full 100% marks in CBSE class 12 results, wants to serve the country by becoming an IAS


विशेष प्रतिनिधी

लखनऊ : कठोर परिश्रम केले तर यश हे हमखास मिळतच असते. आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी तुम्ही मनापासून मेहनत घेतली ना तर यशोशिखरावर जाण्यापासून तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. उत्तर प्रदेशातील बडेरा गावातील एका शेतमजुराची मुलगी अनसूया कुशवाह हिने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) 12 वीच्या परीक्षेत 100% गुण मिळवण्यासाठी अनेक अडचणींवर मात केली. शुक्रवारीच हे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

अनसूयाने अडचणींचा बाऊ केला नाही

अनुसया ही शिव नादर फाउंडेशनद्वारे संचालित ग्रामीण यूपीच्या आर्थिक मागास विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मोफत निवासी शाळेतील विद्यार्थिनी आहे. विद्याज्ञान ही तिची शाळा बुलंदशहरमध्ये आहे.
17 वर्षांची अनसूया म्हणते, “आमच्या गावातील कोणतीही मुलगी इयत्ता आठवीच्या पुढे शिकत नाही. शाळेनंतर त्यांना लगेचच त्यांना लग्नासाठी तयार केले जाते. मला आधीपासूच शिक्षणाची आवड आहे. कारण मला वाटते की, हे असे काहीतरी आहे जे मला इतरांपासून वेगळे राहण्यास मदत करेल. त्याचप्रमाणे मी विद्याज्ञानसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण केली होती.”

सात भावंडांपैकी एक असलेली अनसूया 2014 मध्ये शाळेत दाखल झाली, तेव्हा ती 6 वीत होती. ती म्हणते, आमच्या गावातील मुलेही आठवीपर्यंत शिकतात. त्यानंतर ते आपल्या वडिलांना कारखान्यात मदत करण्यासाठी किंवा गावात शेतमजूर म्हणून काम करण्यासाठी कामाला आहेत. जेव्हा मला अभ्यासासाठी गाव सोडण्याची संधी मिळाली तेव्हा माझ्या पालकांनी मला पाठिंबा दिला. तथापि, गावात असे अनेक लोक होते ज्यांनी माझ्या आई -वडिलांना त्यांची मुलगी हातातून जाईल, असे टोमणे मारले. पण माझ्या पालकांनी या टोमण्यांकडे कधीच लक्ष दिले नाही.

अनसूयाचे आयएएस होण्याचे स्वप्न

अनसूयाला भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) मध्ये अधिकारी होण्याची इच्छा आहे. ती म्हणते, “मला माझ्या गावासाठी काम करायचे आहे, मला वाटते की राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत माझा भाग खूप अविकसित आहे. आरोग्य, शिक्षणाचा अभाव आहे आणि येथील माती सुपीकही नाही.”

अनुसूयाचे वडील गावातील शेतात मजूर म्हणून काम करतात, पण जेव्हा पाऊसकाळ चांगला नसतो तेव्हा त्यांना महोबा जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये रोजंदारीवर मजूर म्हणून काम शोधावे लागते. आर्थिक अडचणी, कुटुंबात व गावात उच्च शिक्षणाची पार्श्वभूमी नसतानाही अनसूयाने मिळवलेले हे यश आता गावातील इतरांनाही प्रेरणा देणारे ठरले आहे. मेहनतीला जर योग्य दिशा आणि योग्य संधी मिळाली तर काय होऊ शकते, हे अनसूयाने आपल्या निकालातून दाखवून दिले आहे.

Inspiring Farmer laborers daughter brought full 100% marks in CBSE class 12 results, wants to serve the country by becoming an IAS

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण