वृत्तसंस्था
नवी दिल्ली : जेईई अॅडव्हान्स्ड-2021 परीक्षा पुढे ढकलली आहे. 3 जुलै रोजी ही परीक्षा होणार होती. परीक्षेची नवी तारीख जाहीर केली जाईल, अशी घोषणा आयआयटी खरगपूरने ही घोषणा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केली. JEE ADVANCE Exam Is Postponed due to Coronavirus
जेईई मेन परीक्षा उत्तीर्ण झालेले टॉपचे अडीच लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. देशातील 23 आयआयटी संस्थांमधील इंजिनीअरिंगच्या बॅचलर, मास्टर्स तसेच दुहेरी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जाते.
जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा अभ्यासक्रम आयआयटी खरगपूरने अधिकृत वेबसाईटवर जाहीर केला होता. सराव परीक्षा पेपरही दिले आहेत. कोरोनामुळे 2020 ची परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 2021 च्या परीक्षेला थेट बसण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यांना पुन्हा जेईई-मेन परीक्षा देण्याची गरज नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App