देशात कुठेही गांजा जप्त झाला तर त्याची पाळेमुळे आंध्रात कशी सापडतात?; दीर्घकाळानंतर चंद्राबाबूंचा हल्लाबोल


वृत्तसंस्था

हैदराबाद : देशभरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो ने कुठेही छापा घालून गांजा पकडला की त्याची पाळेमुळे आंध्र प्रदेशमध्ये कशी काय सापडतात?, आंध्रच्या वायएसआर काँग्रेसच्या सरकारने ढिलाई दाखवल्यामुळे आंध्र प्रदेशात गांजाची शेती फैलावली आहे, असा गंभीर आरोप तेलगू देसम पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. If cannabis is seized anywhere in the country, how can it be found in Andhra Pradesh ?; Chandrababu’s attack after a long time

बर्‍याच दिवसांनी चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेश आणि देशाच्या राजकीय पटलावर पुन्हा दिसायला लागले आहेत. आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्षाच्या काही कार्यालयांवर हल्ले झाले. त्यांचा तीव्र निषेध चंद्राबाबू नायडू यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्याच वेळी त्यांनी आणखी एक गंभीर आरोप केला आहे, तो म्हणजे आंध्र प्रदेशात सुमारे 25 हजार हेक्टर परिसरात गांजाची लागवड करण्यात आली आहे याची किंमत तब्बल 8 हजार कोटी रुपये आहे. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसच्या सरकारने ड्रग्ज माफियांना मोकळे रान मोकळे सोङले आहे. त्यामुळे गांजाची आंध्रमध्ये बिनदिक्कतपणे बहरती आहे, असा आरोप चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.

देशामध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अनेक ठिकाणी छापे घालते आहे. मोठ्या प्रमाणावर गांजा जप्त करते आहे. पण सगळ्या सापडलेल्या गांजाची पाळेमूळे आंध्र प्रदेशमध्ये कशी काय सापडतात?, असा खोचक सवाल चंद्राबाबू नायडू यांनी करून मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांना घेरले आहे.

आंध्र प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. तेलुगु देशम कार्यालयांवर झालेले हल्ले या किरकोळ घटना नाहीत. आंध्रच्या प्रशासनावर सरकारचे नियंत्रण उरलेले नाही. त्यामुळे आंध्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे.

If cannabis is seized anywhere in the country, how can it be found in Andhra Pradesh ?; Chandrababu’s attack after a long time

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात