भारताच्या 100 कोटी लसीकरणाची जागतिक आरोग्य संघटनेकडून विशेष दखल


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताने जिद्दीने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार केला. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली असून संघटनेचे प्रमुख महासंचालक टेडॉर्स घेब्रायासस यांनी भारतीयांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन करणारे ट्विट केले आहे. World Health Organization pays special attention to India’s 100 crore vaccinations

गेल्या दीड वर्षांच्या काळात भारताच्या एवढ्या प्रचंड लोकसंख्येने मोठ्या धैर्याने कोरोनासारख्या घातक लाटेला यशस्वी तोंड दिले. याच काळात भारतीय वैद्यकीय आणि संशोधन क्षेत्राने मोठी मजल गाठत विविध लसींच्या उत्पादनापर्यंत विक्रम केले आणि आता तर त्याहीपेक्षा मोठा टप्पा गाठून देशाच्या मोठ्या लोकसंख्येच्या लसीकरण पूर्ण केले आहे.



100 कोटींचा टप्पा इतक्या अल्पावधीत गाठणे ही खूप मोठी कामगिरी मानली पाहिजे. यासाठी सरकारी यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, संशोधन संस्था, तेथील सर्व अधिकारी कर्मचारी, डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचारी यांचे फार मोठे योगदान आहे. याविषयी टेडॉर्स घेब्रायासस यांनी विशेषत्वाने आपल्या ट्विटमध्ये उल्लेख केला आहे.

कोरोनाची लाट जोरात असताना त्यांच्याच विषयी जागतिक पातळीवर मोठा वाद झाला होता. टेडॉर्स घेब्रायासस हे चीनचे पक्षपाती आहेत, असा आरोप अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. त्यांच्या नि:पक्षपातीपणा विषयी जागतिक पातळीवर मोठी शंका उत्पन्न झाली होती. परंतु सध्या ते जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक आहेत. त्यामुळे त्यांनी भारताचे विशेष अभिनंदन करणे याला महत्त्व आहे.

World Health Organization pays special attention to India’s 100 crore vaccinations

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात